पश्चिम महाराष्ट्र

कवठेमहांकाळचे पहिले नगराध्यक्षपद शिक्षिकेकडे

गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ - दिवसेंदिवस कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार यावर चर्चा रंगत असताना अखेर स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रभाग तीनच्या विजयी उमेदवार साधना कांबळे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे नगराध्यक्षपदी आता साधना कांबळे निश्‍चित झाल्या असताना उपनगराध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार हे उद्या (ता. २३) दुपारनंतर समजणार आहे. एंकदरीतच कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे आता साधना कांबळे यांच्याकडे जाणार आहेत. शिक्षिका ते नगराध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.

१६ मार्चला ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर सर्वच पक्षांना सत्तेचा गड जिंकण्यासाठी तयारी केली होती; मात्र नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठीकरिता लागलेल्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, बसप यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. एकीकडे निवडणुकीमध्ये आघाड्यांचा प्रयोग होत तो यशस्वी ठरला. माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमनताई पाटील, महांकालीचे अध्यक्ष (कै.) विजयराव सगरे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन कोठावळे, अशोकराव जाधव यांनी एकत्रित येत स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना केली, तर खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन विकास आघाडी निर्माण होत या दोन्ही आघाड्यांत सतरा जागांसाठी चुरस होत सामना रंगला.

सतरांपैकी तेरा जागांवर स्वाभिमानीची एक्‍सप्रेस जोरदार धावली, तर चार जागा पटकवित परिवर्तन आघाडीने जोरदार नगरपंचायतीमध्ये प्रवेश केला. एकीकडे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्यामुळे स्वाभिमानीच्या प्रभाग तीनमधून साधना कांबळे, तर प्रभाग चारमधून सविता माने विजयी झाल्या होत्या. त्यामुळे दोन्हींपैकी शहराचा पहिलीच नगराध्यक्ष होण्याची संधी मिळणार असल्याने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही महिला उमेदवार स्वाभिमानी आघाडीच्या असल्याने नेत्यांनी यातून मार्ग काढत साधना कांबळे यांना नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करत निश्‍चित नाव केले आहे.

एकीकडे आघाडीच्या साधना कांबळे नगराध्यक्षपदासाठी निश्‍चित झाले असताना उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार हेही आज (ता. २३) दुपारी समजणार आहे. कामाचा व पदाचा अनुभव असणारे माजी सरपंच सुनील माळी, माजी उपसरपंच चंद्रशेखर सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे हेही विजयी झाले आहेत. एंकदरीतच कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर स्वाभिमानी आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT