पश्चिम महाराष्ट्र

खडकलाट कोविड सेंटरमध्ये खडाजंगी ; पोलिसांचा लाठीचा प्रसाद

आरोग्य कर्मचाऱ्यांना असहकार्य ; तीन-चारवेळा काम बंद

संजय कांबळे

खडकलाट (निपाणी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे सुरु आहे. शनिवारी (ता. ७) ३०० जणांना कोविशिल्ड लस देण्यात येणार होती. त्यासाठी पहाटे ५ पासूनच ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र रजिस्टरमध्ये नांव नोंदवुन घेताना नागरिकांनी वारंवार प्रचंड गर्दी व आरोग्य कर्मचाऱ्यांना असहकार्य केले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी संतापून तीन-चार वेळा काम बंद केले. तसेच एकच झुंबड उडाल्याने पोलिसाच्या लाठीचा प्रसाद काही जणांना खावा लागला.

तीन महिन्यापासून चिक्कोडी तालुका सरकारी रुग्णालयातून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लस पुरवठा होत आहे. मात्र अनियमितपणाबरोबर डोस कमी प्रमाणात येत आहे. आलेल्या लसीबाबत आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांमार्फत नागरिकांना माहिती दिली जाते. शनिवारी (ता. ७) ३०० कोविशिल्डचे डोस आल्याने पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

आज दुसऱ्या डोससाठी विद्यार्थी, औद्योगिक कामगार, शासकीय कर्मचारी यांना लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या व पहिल्या डोससाठी वेगवेगळ्या रांगा लावून सहकार्य करण्याची सूचना करण्यात आली. मात्र त्याक़डे लक्ष न देता नावनोंदणीसाठी झुंबड सुरु झाली. परिणामी या कामात अडथळा निर्माण झाला. यावेळी वादावादीचे किरकोळ प्रकारही सुरुच राहिल्यामुळे आरोग्य सेविकांनी नावनोंदणीचे कामच बंद केले. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवून रांगेत उभे राहण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला.

दुसऱ्या व पहिल्या डोससाठी वेगवेगळ्या रांगा लावून सहकार्य करण्याची सूचना करण्यात आली. मात्र त्याक़डे लक्ष न देता नावनोंदणीसाठी झुंबड सुरु झाली.

यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य वासु गावडे, सुनील पाटील यांनीही नागरिकांनी शांततेत लसीकरणाचे आवाहन केले. गर्दी जास्तच असल्याने गोंधळ कायम राहिला. अखेर ३०० पैकी ७० लसीकरण बाकी असताना काम बंद केले. पहाटे पाचपासून आलेल्या नागरिकांचे दिवसभर खूप हाल झाले. तसेच ताटकळूनही काही जणांना लसीकरणाशिवाय घरी परतावे लागले.

गावच्या तुलनेने जास्त लसीचा पुरवठा व्हावा

खडकलाट गाव हे तुलनेने चिक्कोडी तालुक्यात मोठे आहे. तसेच या प्राथमिक केंद्रात फुटाणवाडी, मनोचीवाडी, पीरवाडी, चिखलव्हाळ, याद्यानवाडी, कुठाळी, कोथळी, नाईंग्लज, पांगिरे-अ ही गावे येतात. तेंव्हा या केंद्रातील लोकसंख्येनुसार आरोग्य खात्याने दररोज लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्रा. पं. पदाधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT