Khatav murder Get Ten Lakh
Khatav murder Get Ten Lakh 
पश्चिम महाराष्ट्र

खुनासाठी दहा लाखांची सुपारी 

सकाळवृत्तसेवा

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे आनंदराव पाटील याचा दहा लाखाची सुपारी देवून खून केल्याचे समोर आले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय रामदास जाधव (वय 33, निरा. ता. बारामती, पुणे), अतुल रमेश जाधव (वय 22, रा. बावडा, खंडाला, सातारा), लक्ष्मण बाबुराव मडीवाल (वय 60), अरविंद शंकर पाटील (वय 65, दोघे रा. खटाव, पलूस) अशी त्या चौघांची नावे आहेत. यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पूर्ववैमान्यस्य आणि जमिनीच्या खरेदीच्या आर्थिक वादातून हा काटा काढल्याची कबुली चौघांनी दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक माहिती अशी, की लक्ष्मण मडीवाल याच्याविरोधात मृत आनंदराव पाटील यांनी वर्षभरापूर्वी भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मडीवाल हा कारागृहात होता. तो राग त्याचा मानात कायम होता. दरम्यानच्या काळाता अरविंद पाटील याची साडेतीन एकर शेती आनंदराव पाटील यांनी विकत घेतली होती. बळाच्या जोरावर ही शेती घेतल्याने अरविंद पाटील याचाही राग त्यांच्यावर होता. दोघांनीही वर्षभरापूर्वीच आनंदराव पाटील यांचा काटा काढण्याचे ठरविले होते. लक्ष्मण मडीवाल यास एक गुन्हेगाराने दत्तात्रय जाधव याची ओळख करून दिली. तो सुपारी घेवून खून करत असल्याचेही सांगितले. त्यानंतर चर्चा झाली. दत्तात्रय जादव याने खुनासाठी चाळीस लाखांची मागणी केली. तडजोडीनंतर दहा लाखांची रक्कम देण्याचे ठरले. 

दरम्यान, हल्लेखोर दत्तात्रय जाधव याने मावस भावाच्या मुलगा अतुल जाधव याच्यासोबत गेल्या सहा महिन्यापासून खटाव परिसरात नजर ठेवून होता. गल्लीन गल्ली त्यांनी पाठ करून ठेवली होती. आनंदराव पाटील रविवारी (ता.2) सकाळी घरातून दुचाकीवरून बाहेर पडले. त्यावेळी दत्तात्रय जाधव आणि अतुल जाधव हे दोघेही त्यांच्या मागावर होते. मात्र, त्यांच्या गाडीवर लहान मुलगा असल्याने दोघांनीही हल्ला केली नाही. त्यानंतर आनंदराव पुन्हा अकराच्या सुमारास शेतात गेले होते. त्यावेळी दुचाकीवर ते एकटेच असल्याने हल्लेखोरांनी त्यांच्या पाठलाग केला. अतुल दुचाकी चालवत होता. तर दत्तात्रय याच्याकडे अडीच फुटी कोयता होता. पावणे बाराच्या सुमारास खटाव- माळवाडी रस्त्यावर आनंदराव पाटील आल्यानंतर हल्लेखोर समोरून आले. क्षणात त्यांनी धारदार कोयत्याने पाटील यांच्या डोक्‍यात वर्मी घाव केला. तसेच हातावरही वार केले. हल्लेखोरांनी पळ काढला. रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आनंदराव पाटील यांचा मृत्यू झाला. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण सह सहा पथके या खुनाच्या तपास करत होता. हा खून सुपारी देवून झाल्याचे समोर आल्यानंतर त्याअनुषंगाने तपासाची सुत्रे हलविण्यात आले. एलसीबीच्या पथकास धागेदोरे हाती लागल्यानंतर तत्काळ चौघांनाही अटक करण्यात आली. त्यांनी खुनाची कबुली दिली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. संशयित हल्लेखोर दत्तात्रय जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून लोणंद व निरा पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. 

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक निरीक्षक सुनील हारूगडे, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अंतम खाडे, प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, अमित परीट, संजय कांबळे, साईनाथ ठाकुर, हेमंत ओमासे, वैभव पाटील, राजु मुळे, राजु शिरोळकर, जितेंद्र जाधव, विकास भोसले, प्रशांत माळी, सचिन कनप, मच्छिंद्र बर्डे, सचिन धोत्रे, विजयकुमार पुजारी यांचा कारवाईत सहभाग होता. 

कोयता परप्रांतीय बनावटीचा 
खुनासाठी वापरलेला कोयता सुमारे अडीच ते तीन फूट लांबीचा विशिष्ट आकाराचा आणि परप्रांतीय बनावटीचा आहे. तो धागा लक्षात घेऊनही पोलिसांनी कर्नाटकसह सांगली, सातारा, कराड याठिकाणी तपासाची सुत्रे हलविले. 
 
तांत्रिक तपास महत्वाचा 
खुनानंतर कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती नव्हते. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास करण्यात आला. सहा महिन्यापूर्वीपासूचे सर्व रेकॉर्ड तपासण्यात आले. इतकेच नव्हे, तर खटावसह पलूस तालुक्‍यांतील शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तापली. त्यानंतर आज एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. 

सहा महिन्यांपासून प्लॅनिंग 
हल्लेखोर हे सारईत असल्याने त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून खुनाच्या कटाचे प्लॅनिंग केले होते. दोघेही खटावसह भिलवडी परिसरात दररोज येवून रेकी करत होते. गल्ली बोळ पाठ करून ठेवला होता. घटनेदिवशी दुचाकीवरून समोरून येवून हा हल्ला चढवला. निर्जनस्थळी हा हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून दोघेही पसार झाले. पाचवामैल येथे आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे ते मोटार सायकवलवरून कराडला निघून गेले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT