पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर!

आयाज मुल्ला

वडूज -  खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, उपसभापती कैलास घाडगे यांच्यावरील अविश्वास ठरावाची तालुक्‍यात जोरदार चर्चा होत आहे. तालुक्‍यावर कायम वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने यापूर्वी या पदांत समन्यायी पद्धतीने प्रत्येकाला समान संधी दिली. त्यामुळे पक्षाच्या समन्यायी पद्धतीला जनतेनेही पसंती दर्शविली होती. मात्र, सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठराव प्रकरणाने तालुक्‍यातील राष्ट्रवादीतील गटबाजी या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये पंचायत समितीची निवडणूक झाली. त्यात १२ पैकी आठ जागा जिंकून राष्ट्रवादीने पंचायत समितीवर आपली सत्ता कायम ठेवली होती. सभापतिपद सर्वसाधारण असल्याने मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती. त्यावेळी संदीप मांडवे यांना सभापतिपद तर कैलास घाडगे यांना उपसभापतिपद देऊन पक्षश्रेष्ठींनी पंचायत समितीच्या सत्तेत तालुक्‍याचे ध्रुवीकरण साधले होते. सभापती, उपसभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या अन्य सदस्यांना सव्वा वर्षाने संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सभापती मांडवे व उपसभापती घाडगे यांचा सव्वा वर्षाचा कालावधी दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर अन्य सहा जणांना उर्वरित पावणेचार वर्षांच्या कालावधीत संधी मिळण्याची अपेक्षा लागून राहिली. सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही मांडवे व घाडगे यांनी पदांचे राजीनामे न दिल्याने सदस्य संतोष साळुंखे, हिराचंद पवार, आनंदराव भोंडवे, कल्पना मोरे, रेखा घार्गे, जयश्री कदम व त्यांच्या समर्थकांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत धाव घेतली. दोन ते तीन दिवसांपूर्वी पंचायत समितीची मासिक सभा झाली.  त्यावेळी राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी सभेतून बाहेर जावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप व काँग्रेसच्या सदस्यांच्या उपस्थितीत सभापती, उपसभापतींनी ही सभा अखेरपर्यंत सुरू ठेवली. अखेर राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी सभापती, उपसभापतींविरोधात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला.

जनमाणसांत ठसा 
गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवून सभापती, उपसभापतींनी जनमाणसांत पंचायत समितीच्या चांगल्या कारभाराचा ठसा उमटविला आहे. याशिवाय सातत्याने जनसंपर्कामुळे सर्वसामान्य नागरिकांतही चांगली लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात असणाऱ्या पंचायत समितीचा नागरिकांत चांगला नावलौकिक निर्माण झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

SCROLL FOR NEXT