shri machindranath maharaj sakal
पश्चिम महाराष्ट्र

Killemachindragad : नाथ सांप्रदायांचे आद्यपीठ किल्लेमच्छिंद्रगड! बारा वर्षातून नाथ सांप्रदायाच्या साधुंची येते झुंड

ऐतिहासीकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्याही किल्लेमच्छिंद्रगड पर्यटन स्थळ पाहण्यासारखे असल्याने गेल्या दहा वर्षात येथे भाविक, पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) - नाथ संप्रदायाचे आद्यगुरू सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीने धार्मिकदृष्ट्या पावन असलेले वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगडाच्या डोंगर पायथ्याशी वसलेले किल्लेमच्छिंद्रगड हे गाव. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या गडाची निर्मिती केली. हा गड गिरिदुर्ग प्रकारात येतो.

स्वराज्याच्या काळात गडावर पाण्यासाठी खोदलेल्या विहिरी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. त्याबरोबर संपूर्ण गडास केलेली तटबंदीही लक्षवेधी आहे. गड बांधण्यासाठी वापरलेली चुनाभट्टी आजही अस्तित्वात आहे, तसे गड आणि गड परिसरात सापडलेल्या तोफा आजही चांगल्या अवस्थेत असून त्याही येथे येणाऱ्या पर्यटकांची, इतिहास प्रेमिंचे लक्ष वेधून घेतात. येथे आढळणाऱ्या ऐतिहासीक अवशेषाबरोबर सेल्फी काढून पर्यटक आपल्या मनाची हौस पुरवून घेतात.

ऐतिहासीकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्याही किल्लेमच्छिंद्रगड पर्यटन स्थळ पाहण्यासारखे असल्याने गेल्या दहा वर्षात येथे भाविक, पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. सकाळचा सूर्योदय आणि सायंकाळच्या सुर्यास्ताचे दर्शन विलक्षण विलोभनिय असल्याने निसर्गप्रेमी नेत्रसुख घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.

पर्यटन स्थळाचा विकास करीत असताना गडाच्या मुळ साच्याला बाधा येवू न देता काम केले असल्याने गडावरील मेघडंबऱ्यातून कृष्णाकाठच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणे पर्यटकांना पर्वणीच आहे.

शिवकाळात या गडाची निर्मिती टेहळणी गड म्हणून केली असल्याने साध्या डोळ्यांनीही परीसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येतो. दुर्बिण असेल तर येथून पन्हाळगडाचेही दर्शन घेता येते. गेल्या दहा वर्षांत या गडाचा पर्यटन स्थळ म्हणून मोठ्या प्रमाणात विकास होवून गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता झालाय. त्यामुळे मोकळ्या हवेत पाय मोकळे करण्यासाठी जसे वयोवृद्ध व्यक्ती येतात.

तसेच भारतीय सेनेत, पोलीस सेवेत जाणारे युवकही मोठ्या संख्येने व्यायामासाठी येतात. आज गडाची ख्याती राज्याबाहेरही असून, दहा वर्षापुर्वी खासदार असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गडास भेट दिली होती. शहिद प्रशांत पाटील यांच्या परिवाराने गडावर वृक्ष लागवड केली असून शंभर एकर पर्यटन क्षेत्र हरीत करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील वृक्षलागवड चांगलीच बहरली असून आज त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या सौंदर्यात भर पडली आहे.

किल्लेमच्छिंद्रगडाकडे जाण्याचे मार्ग -

• इस्लामपूरपासून पर्यटन स्थळ सुमारे १७ किलो मीटर अंतरावर आहे. इस्लामपूरहुन रेठरे कारखाना बसने गड फाट्यावर उतरून गडावर जाता येते.

• कऱ्हाडहूनही सुमारे १८ किलो मीटर अंतर असून गड खिंडीत उतरून गडावर जाता येते.

• आशियायी मार्गापासून सुमारे १२ किलो मिटर अंतरावर असणाऱ्या या गडाकडे कासेगांवहून तांबवे-नरसिंहपुर मार्गे गडफाट्यावर येवुन गडावर जाता येते.

• गडावर जाण्यासाठी पक्क्या स्वरूपाचा रस्ता असून दुचाकी, चारचाकी वाहनांने जाता येते. मात्र गडावर जाण्यासाठी वाहने सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

• गडावर रहाण्याची, जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गडावर मुक्काम करता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT