Killemachindragad Road Condition
Killemachindragad Road Condition Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Killemachindragad News : एक कोटी गेले पाण्यात! पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दुरावस्था

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) - येथील पर्यटन स्थळकाडे जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील एक कोटी रूपये खर्च करून केलेल्या काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने खडी उघडू पडू लागली आहे. विसावा ते मंदीरापर्यत रस्त्याने जाताना उघड्या पडलेल्या खडीवरून दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. दोन वर्षापूर्वी दुचाकी घसरून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सिमेंटचा वापर कमी आणि केलेल्या कामास पाणी कमी दिल्याने रस्ता ठिसूळ झाला आहे.

सहा वर्षापुर्वी येथील पर्यटनस्थळी असलेल्या सद्गुरू मच्छिंदनाथ महाराज यांचे मंदीरापासून डोंगरमध्यापर्यंत रस्ता काँक्रेटीकरणाचे काम करणेत आले. काम सुरु असताना मुरूम माती टाकून लेवल होण्यासाठी रोलिंग केले गेले नाही. त्यामुळे रस्त्याची जाडी एकसारखी राहीली नाही.

परीणामी मुळच्या मुरुमावर काँक्रीट टाकल्याने रस्ता ओबडधोबड झाला. गडावर जाण्यासाठी खडा चढ असल्यामुळे सध्या रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरू लागला आहे. रस्ता सुधारणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे.

'पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी रस्ता झाल्याने परिसरातून पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत रस्ता खराब होणे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. रस्ता दुरुस्ती तातडीने व्हावी.

- राहूल निकम, माजी उपसरपंच, किल्लेमच्छिंद्रगड

'पहिल्या टप्प्यातील काम पाहिल्यास रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. जीवघेण्या रस्त्याने गडावर दुचाकीने जाणे धोकादायक झाले आहे. रस्ता सुधारणेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून पर्यटकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात यावे.

- सुहास पवार, शिवनगर (किल्लेमच्छिंद्रगड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT