पश्चिम महाराष्ट्र

‘किसान सन्मान’साठी एक लाख अर्जांची नोंदणी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख पात्र शेतकऱ्यांपैकी आजअखेर एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची केंद्राच्या संकेतस्थळावर नोंदणी झाली आहे.

शिवजयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही जिल्हा प्रशासनासह इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी अर्ज नोंदणी करण्यात व्यस्त राहिले. गेल्या मंगळवार (ता. १२)पर्यंत एक हजार अर्जांची नोंदणी झाली होती. त्यानंतर नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांत ९९ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अत्यल्प भूधारकांना दर वर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. हा निधी टप्प्यात दिला जाईल. दोन हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील तीन लाख ५० पात्र शेतकऱ्यांपैकी एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली आहे. यासाठी तलाठी, सर्कल, तहसीलदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह गावपातळीवरील सेवा संस्थेच्या सचिवांनी चांगले आणि जलद गतीने काम पार पाडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.

पात्र सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा कृषी अधीक्षक, सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जलदगतीने काम करीत आहेत. सुमारे तीन लाख ५० हजार अर्ज आले आहेत. त्यातील आजअखेर एक लाख सहा हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. उद्या (ता. २०) रात्रीपर्यंत सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम केले जाणार आहे.  
- दौलत देसाई,
जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

SCROLL FOR NEXT