kognoli toll plaza case Esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोगनोळी नाक्यावर कडक बंदोबस्त करा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांची कोगनोळी नाक्याला भेट

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील दूधगंगा नदीवर असणाऱ्या कर्नाटक (Karnataka) सीमा तपासणी नाक्याला रविवारी (ता. २८) बेळगाव (Belguam) जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार (R.Venkatesh Kumar)यांनी भेट देऊन सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी केली. कडक बंदोबस्त ठेवण्यासह अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार म्हणाले, महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र व अहवाल पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्यावा. बंदोबस्त कडक करावा. अहवाल नसणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश देऊ नये त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून द्यावे. दोन दिवसात रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी, कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर सुरू असणार्‍या कामकाजाची माहिती दिली.

यावेळी डॉ. बागेवाडी, निरीक्षक अभिजित गायकवाड, सर्कल अजित वंजोळे, कोगनोळीचे तलाठी के. एल. पुजारी, ग्रामसेवक सुधीर बोरगावे, नंदकुमार पाटील, किसन सोनुले, कोगनोळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, एम. एस. सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य, पोलिस, महसूल विभाग, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT