kolhapur Holy Evangelist Church praying in Marathi kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

मराठीत प्रार्थना होणारे होली इव्हॅनजोलिस्ट चर्च...

सुधाकर काशिद

कोल्हापूर - पंचगंगा नदीचा पूल ओलांडून कोल्हापुरात प्रवेश करता क्षणी, कोल्हापूरच्या प्राचीनत्वाचा पुरावा असलेली ब्रह्मपुरी टेकडी लागते. आणि टेकडीच्या पायथ्याला एका विस्तीर्ण चिंचेच्या झाडाखाली एक चर्च नजरेस येते, या चर्चचे नाव होली इव्हॅनजोलिस्ट चर्च. पण ब्रह्मपुरीवरचे चर्च अशीच त्याची ओळख. तत्कालीन परिस्थितीत कोल्हापुरातील ब्रिटिश अधिकारी, त्यांचे सहकारी रेसिडेन्सीतल्या चर्चमध्ये जायचे. त्या चर्चमध्ये सारा व्यवहार इंग्लिशमध्ये. त्यामुळे स्थानिक ख्रिश्‍चन बांधवांची अडचण व्हायची. मग त्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांना मनोभावे प्रार्थना, उपासना करता यावी, म्हणून हे चर्च बांधले. आणि मदर चर्च येथे मराठी भाषेत उपासना करण्यासाठी ख्रिश्‍चन बांधव एकत्र येऊ लागले. 

ब्रह्मपुरी टेकडीवर १९०६ मध्ये बांधकाम

ब्रह्मपुरी टेकडीवरच्या या चर्चची उभारणी १९०६ ला झाली. या चर्चजवळच ख्रिश्‍चन बांधवाची छोटी छोटी टुमदार घरे आहेत. प्रत्येक घराला कुंपण, दारात फुलझाडे, रस्त्यावर स्वच्छता, घरादारावर लटकणाऱ्या चांदण्या असे इथले प्रसन्न वातावरण आहे. चर्चच्या दरवाजातच चिंचेचे एक जुने झाड आहे. त्याचा विशाल बुंधा आणि गर्द सावली देत पसरलेल्या फांद्या यामुळे या चिंचेखालचा कठडा म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे. किंबहुना मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंतचा काळ सोडला तर या चर्चसमोरच्या झाडाखाली लोक निवांत बसलेले नाहीत असा क्षणच नाही.

अशी होते मराठीत प्रार्थना 

चर्चमध्ये दर रविवारी सकाळी साडेसात वाजता २४ डिसेंबरला रात्री साडेदहा वाजता, २५ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता व १ जानेवारीला सकाळी साडेसात वाजता सामुहिक प्रार्थना होते. विशेष हे की, या प्राथनेत सर्व जग नितीमत्ता शांततेच्या मार्गाने चालावे, टंचाई दुष्काळाचे निवारण व्हावे, सर्व ऋतुनीं चांगले पर्यावरण द्यावे अशा अर्थाची प्रार्थना केली जाते. या चर्चचे प्रमुख एस. एम. गोगटे आहेत. सचिव सतीश कांबळे, खजानिस संदीप आवळे व १४ सदस्य या चर्चचा कारभार पाहतात. 

इंग्लंडमधून चर्चसाठी आणले फर्निचर

या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे जशी इंग्लंडमधल्या चर्चमध्ये उपासना होते, त्याच पद्धतीने या चर्चमध्ये मराठीत उपासना होते. चर्चच्या प्रमुखांना मोठा सन्मान देत चर्चमधल्या परमपवित्र स्थानी नेले जाते. या चर्चमधली घंटा, डायस, खुर्च्या, फर्निचर हे सारे इंग्लंडमधून आणलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT