कोल्हापूर ः डीएसकेविरोधात तक्रार देण्यासाठी रविवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांनी केलेली गर्दी.
कोल्हापूर ः डीएसकेविरोधात तक्रार देण्यासाठी रविवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांनी केलेली गर्दी. 
पश्चिम महाराष्ट्र

‘डीसके’विरोधात १५० तक्रारी दाखल

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - पुण्याच्या ‘डीएसके’ कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळाल्याबाबत सुमारे दीडशे गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम तब्बल २५ कोटी रुपयाच्या घरात असल्याची माहिती गुंतवणूकदारांचे वकील सत्यजित पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

पुण्यातील ‘डीएसके’ कंपनीत ठेवलेल्या ठेवी गुंतवणूकदारांना मुदत संपूनही मिळत नसल्याने शहरासह जिल्ह्यातील ठेवीदारांनी मिळून डीएसके गुंतवणूकदार संघटना तयार केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रार दिली होती. त्यापैकी बाजीराव किल्लेदार यांनी ९ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीच्या तिघांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. यात कंपनीच्या दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंती दीपक कुलकर्णी आणि शिरीष दीपक कुलकर्णी यांचा समावेश होता. आज सकाळी संघटनेच्या सदस्यांची हुतात्मा गार्डन येथे बैठक झाली. बैठकीत डीएसके गुंतवणूक केलेल्या सुमारे दीडशे ठेवीदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार दुपारी ते ठेवीदार वकिलांसोबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी तक्रार अर्ज दाखल केले. तक्रारीत दिलेल्या गुंतवणुकीची रक्कम २५ कोटींच्या घरात आहे. याबाबत लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असे ॲड. पवार 
यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT