पश्चिम महाराष्ट्र

म्हशींचा डौलदार रोड शो..!

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शिंगांना मोरपिस, पायात चांदी-सोन्याचा तोडा व कवड्यांच्या माळेने सजलेल्या म्हशींनी परंपरेनुसार हलगी-घुमक्‍याच्या तालात डौलदार रोड शो केला.

कसबा बावडा, वडणगे आदी परिसरातही दूध व्यावसायिकांनी म्हशींच्या सवाद्य मिरवणुका काढल्या. दिवाळी पाडव्यादिवशी शनिवार पेठ गवळी गल्लीत तर भाऊबिजदिवशी सागरमाळ येथे झालेल्या या सोहळ्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त गर्दी केली.  शनिवार पेठेतील सोहळ्यात यंदा मुलींनाही मान मिळाला. एलईडी दिव्यांनी म्हशीची शिंगे सजवण्यावर अनेक व्यावसायिकांनी भर दिला.

दिवाळी पाडव्याला म्हशींना सजविण्यासाठी येथील गवळी व्यावसायिकांत यंदाही सकस ईर्षा राहिली. पंचगंगा घाटावर म्हशीच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत त्यांच्यात चढाओढच होती. शिंगे लाल रंगाने रंगवून परिसरातील सर्व म्हशी एकत्र आणल्या गेल्या. मोरपिसांचे तुरे शिंगांना लावून, सजलेल्या म्हशींची पूजा झाली आणि शहरातील सर्व गवळी व्यावसायिक म्हशींना घेऊन गवळी गल्लीत आले. म्हशींचा रोड शो सुरू झाल्यानंतर तो पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची येथे मोठी गर्दी झाली. विविध संस्था, संघटनांसह सम्राट चौक मित्र मंडळ आणि गवळी गल्ली मित्र मंडळानेही सर्वांचे स्वागत केले. आज सागरमाळावरही याच म्हशींनी सागरदेवाचे पूजन केले. रेड्यांनाही येथे सजवून आणले होते. त्यांना दोन पायांवर उभे करण्याचे आणि तीन हाकेत बोलावण्याचे गवळी व्यावसायिकांचे कौशल्यही या निमित्ताने सर्वांनाच अनुभवता आले. 

कृतज्ञतेची दिवाळी
बैलपोळा सोडला, तर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या जनावरांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसरा असा दिवस नसतो; पण जनावरांवर प्रेम कसे करावे, याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो कोल्हापुरातच मिळतो. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशीच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत येथे चढाओढ दिसते. त्यासाठी गवळी व्यावसायिक म्हशीवर हजारो रुपये खर्च करतात. येथे परिसरातील सर्व म्हशी एकत्र आणल्या जातात. 

नावातच सगळं आहे...
म्हशींची नावे ही सुद्धा अस्सल कोल्हापुरी परंपरा. एखादी म्हैस वेगाने धावत असेल तर ती ‘सैराट’ किंवा ‘बुलेट’ अशा नावाने ओळखली जाते. म्हशीचे डोळे घारे व भोरी रंगाची असेल, तर तिचे नाव ‘ऐश्‍वर्या’ अर्थात ‘ऐश’ म्हणून तिचे नामकरण होते. ‘टेक्‍सास’, ‘गौरी’, ‘बावरी’, ‘पतंग’, ‘उत्तरेश्‍वरची राणी’ अशीही वैविध्यपूर्ण नावे आहेत. दरम्यान, प्रसिद्ध हालगीवादक कै. तानाजी साठे यांच्या हलगी वादनाच्या स्मृतींनाही सोहळ्यात यानिमित्ताने उजाळा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT