पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील पोलिस पुत्राकडून फसवणूक

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मलेशियात अडकलेल्या महाराष्ट्रीयन तरुणांचे पासपोर्ट एजंटांनी काढून घेतले आहेत. त्यामुळे त्यांनाही मायदेशी परत येणे अशक्‍य होत आहे. सांगलीतील पोलिस पुत्राने या तरुणांची फसवणूक करून मलेशियाला पाठविल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 

नोकरीच्या आमिषाने येथून पाठविलेल्या आणि सध्या मलेशियात असलेल्या तरुणांकडील ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपलेली आहे. वर्किंग व्हिसा डुप्लिकेट आहेत. पासपोर्टही एजंटांनी काढून घेतले आहेत. त्यामुळे या तरुणांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. 

नोकरीच्या आमिषाने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथील तरुणांना मलेशियामध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्यांना महिन्याच्या कालावधीचा ट्रॅव्हल व्हिसा दिला आहे. व्हिसा संपेपर्यंत त्यांना नोकरी दिली नाही. व्हिसा संपल्यावर त्यांना नोकरी दिली. ती देतानाही त्यांना वर्किंग व्हिसा देण्यात आला. हा व्हिसा डुप्लिकेट असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे वीस-पंचवीस तरुणांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अक्कलकोट, कर्जत, कऱ्हाड, जळगाव येथील तरुणांना २३ दिवसांपूर्वीच अटक झाली आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांचा नातेवाइकांशी संपर्क नाही. यांपैकी काहींच्या मित्रांनी ही माहिती कऱ्हाडमधील एका तरुणाच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर प्रकरण उजेडात आले. तेथे गेलेल्या कोल्हापूरसह इतर तरुणांनी मलेशियातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचेही पासपोर्ट तेथील एजंटांनी काढून घेतले आहेत. 

सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एक पोलिसाच्या मुलग्याने या तरुणांची फसवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे. तो सातारा जिल्ह्यातील एका केटरिंग कॉलेजमध्ये शिक्षक होता. त्याने काही मुलांशी संपर्क साधून त्यांना मलेशियाला पाठविले आहे. त्यासाठी प्रत्येकाकडून शुल्क वसूल केले आहे. सांगली पोलिस सध्या विविध कारणांनी चर्चेत असतानाच हा नवा प्रकार पुढे आला आहे.

कर्जतमध्ये झाली नोंद
नगर जिल्ह्यातील कर्जतमधील दोन तरुण मलेशियातील तुरुंगात अडकले आहेत. माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाइकांनी काल कर्जत येथे पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. तेथील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील एजंट कऱ्हाडचा आणि सूत्रधार सांगली जिल्ह्यातील आहे. 

कागलच्या मलेशियातील तरुणाचे प्रयत्न
रविवारीच्या ‘सकाळ’मध्ये ‘मलेशियात तरुण अडकले जेलमध्ये’ ही बातमी प्रसिद्ध झाली. ती बातमी येथील एका तरुणाने मलेशियातील त्याचे मित्र प्रवीण नाईक यांना सोशल मीडियावरून पाठवली. मूळचे कागलचे; पण सध्या मलेशियात उच्चपदावर असणारे प्रवीण नाईक यांनी कागलमधील ‘सजग नागरिक मंच’ या ‘व्हॉटस्‌ ग्रुप’वर बातमी पोस्ट केली. ग्रुपमधील संदीप जिरगे यांनी ‘सकाळ’चा संदर्भ त्यांना दिला. त्यानंतर प्रवीण यांनी मलेशियातून दूरध्वनीवरून ‘सकाळ’कडून याबाबतची माहिती घेतली आणि त्या तरुणांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT