पश्चिम महाराष्ट्र

होळी रे होळी... यंदाही करू इको फ्रेंडली..!

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘होळी लहान करू- पोळी दान करू’ ही चळवळ आता अधिक व्यापक झाली आहे. यंदाही पर्यावरणपूरक होळीवर भर दिला जाणार आहे. विविध संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याशिवाय शाळाशाळांतील हरित सेनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही केवळ पोळीदानच नव्हे, तर शेणी संकलित करून ग्रामपंचायतीकडे दिल्या जाणार आहेत. 

एकट्या कोल्हापूर शहरातच प्रत्येक वर्षी किमान ६० हजार घरगुती आणि चार ते पाच हजारांवर सार्वजनिक होळ्या होतात. मात्र, पूर्वी भल्या मोठ्या होणाऱ्या होळीची उंची आता कमी झाली असून, परंपरा म्हणून लहान होळी साजरी करायची आणि उर्वरित शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान करण्याची नवी परंपरा या निमित्ताने अधिक सजगपणे पुढे आली. 

१३ वर्षांपूर्वी २००५ मध्ये स्मशानभूमीला तीन लाखांवर शेणी दान झाल्या होत्या. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला; पण सहा-सात वर्षांपासून पुन्हा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळू लागला. २०११ मध्ये ५८ हजारांवर शेणी दान झाल्या. त्यानंतर सलग दोन वर्षे हा आकडा लाखाच्या आसपास राहिला. २०१४ मध्ये एकट्या महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टनेच एक लाख अकरा हजार शेणी स्मशानभूमीस दिल्या; तर २०१५ पासून किमान दीड लाखावर शेणी दान झाल्या. गेल्या वर्षी विविध संस्था, संघटना आणि सेवाभावी व्यक्तींनी पंचगंगा स्मशानभूमीकडे एकूण दोन लाख ७३ हजार ७६४ इतक्‍या शेणी सुपूर्द केल्या. 

मोफत अंत्यसंस्कार
महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार होतात. एका अंत्यसंस्कारासाठी किमान ४०० शेणी, १२० किलो लाकूड लागते. स्मशानभूमीत रोज सरासरी १० ते १५ अंत्यसंस्कार होतात.

रस्त्यांची खबरदारी...
शहरातील विविध चौकांत सार्वजनिक होळी साजरी केली जाते. मात्र, मुळात यातील बहुतांश रस्त्यांना डांबर लागते, ते ‘मार्च एंडिंग’च्या पूर्वी आठ-दहा दिवस अगोदर. याच काळात होळीचा सण येत असल्याने अनेक मंडळांनी होळी लहान करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या होळीमुळे रस्त्यात खड्डे पडतात आणि पुढे पावसाळ्यात हेच खड्डे अनेकांचे कंबरडे मोडतात, हा अनुभवही त्यामागे आहे. गुरुवारी (ता. १) सर्वत्र होळीचा सण साजरा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT