पश्चिम महाराष्ट्र

घरफाळावाढीचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिका फेटाळणार

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महापालिकेच्या आज (ता. २०) होत असलेल्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने ठेवलेला घरफाळावाढीचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला असल्याचे समजते. प्रस्ताव सादर करत असताना महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नसल्याची चर्चा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा अधिक असल्याचा अहवाल क्रेडाई संस्थेने दिल्यापासून शहरात घरफाळ्याची चर्चा सुरू आहे. क्रेडाई संस्थेने सर्वेक्षण करून त्यांनी हा अहवाल आयुक्‍तांना सादर केला होता. हा घरफाळा कमी करावा, अशी त्यांची मागणी होती.

विशेषत: भाडेतत्त्वावरील इमारतींना अन्य महापालिकांमध्ये असणारा घरफाळा आणि येथील महापालिकेतर्फे आकारण्यात येत असलेल्या घरफाळा यात खूप मोठी तफावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात आयुक्‍तांशी चर्चाही करण्यात आली. मात्र सध्या महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत घरफाळा विभाग बनत चालला आहे. त्यामुळे घरफाळा कमी करण्यासाठी प्रशासन फारसे सकारात्मक नव्हते. त्याची चर्चा सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे घरफाळावाढीचा प्रस्ताव सादर केला.

दरवर्षीप्रमाणे स्थायी समितीने त्याकडे न पाहता घरफाळावाढीचा चेंडू महासभेपुढे ढकलला. प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावात १० पासून ३० टक्‍क्‍यांपर्यंत घरफाळावाढ सुचविली आहे. महापालिकेच्या आर्थिक स्रोतांमध्ये जकात व नंतर एलबीटी बंद झाल्यानंतर नगररचना विभागाने महत्त्वाची भूमिका बजाविली होती. सरकारच्या नव्या धोरणामुळे नगररचना विभागाच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या. त्यामुळे यावेळचे अपेक्षित उद्दिष्ट देखील हा विभाग गाठू शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे सध्या घरफाळा हाच महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच स्रोत असणार आहे.

सध्याचा घरफाळा अधिक असला तरी महापालिका प्रशासनाने २०११ पासून घरफाळ्यामध्ये एक रुपयाची देखील वाढ केलेली नसल्याने हा प्रस्ताव आणला असावा. रहिवास आणि व्यावसायिक अशा दोन प्रकारच्या मिळकतींमध्ये वाढ सुचविली आहे. नवीन प्रस्तावात ५०० चौरस फुटाच्या आतील मिळकतींना कोणतीही वाढ सुचविली नसली तरी अशा मिळकतींची संख्या फार कमी आहे. मध्यमवर्गीयांच्या मिळकती साधारणपणे पाचशे ते एक हजार चौरस फुटादरम्यान असतात. त्यांना दहा टक्‍के वाढ सुचविण्यात आली आहे. एक हजार चौरस फुटांवरील मिळकतीस २० टक्‍के वाढ सुचविण्यात आली आहे. याच आकाराच्या व्यावसायिक मिळकतींना आकारानुसार २० टक्के व ३० टक्‍के वाढ सुचविण्यात आली आहे. भाडेतत्त्वावरील मिळकतींची वाढ मात्र थेट दुप्पट सुचविण्यात आली आहे.

घरफाळावाढीच्या प्रस्तावावर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती; मात्र हा प्रस्तावच लोकप्रतिनिधींना दाखविण्यात आला नसल्याचे बोलले जाते. शहरात अगोदरच घरफाळा सर्वाधिक असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. त्यात प्रशासनाने घरफाळ्यात आणखी वाढ करणारा प्रस्ताव सभेपुढे आणला आहे. त्याला एकमुखाने विरोध करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT