पश्चिम महाराष्ट्र

राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात अकरा जणांना आजन्म कारावास

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथील राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या दोन्ही खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यात एकूण 11 जणांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी.बिले यांनी ही शिक्षा सुनावली. निकालाच्यावेळी न्यायसंकुलातील जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटाच्या समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून ही गर्दी हटविली. दरम्यान पाचगाव मध्येही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

मयत अशोक मारुती पाटील (रा.पाचगाव) याच्या खून प्रकरणी दिलीप अशोक जाधव उर्फ डी.जे., अमोल अशोक जाधव, हरिष बाबूराव पाटील, ओंकार विद्याधर सुर्यवंशी, महादेव उर्फ हेमंत म्हसगोंडा कलगुटकी या सर्वांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर तीन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विवेक शुल्क यांनी सांगितले. पाटील यांच्यावतीने त्यांचा मुलगा मिलिंद पाटील याने फिर्याद दिली होती. 13 फेब्रुवारी 2013 ला हा खून झाला होता. 

मयत धनाजी तानाजी गाडगीळ (रा.पाचगाव) याच्या खून प्रकरणी मिलिंद अशोक पाटील, महेश अशोक पाटील, अक्षय जयसिंग कोंडेकर, निशांत नंदकुमार माने, प्रमोद कृष्णात शिंदे, गणेश कलगुटकी यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांना अाजन्म कारावास, प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. 23 डिसेंबर 2013 ला पाचगाव परिसरातील प्रगती कॉलनी चौकात हा खून झाला होता. अशोक पाटील याच्या खुनाचा बदला म्हणून हा खून करण्यात आला होता, विशेष सरकारी वकील श्रीकांत जाधव (सांगली) यांचे सहाय्यक विश्‍वजित घोरपडे यांनी ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT