पश्चिम महाराष्ट्र

पेट्रोल दरवाढीचा भडका; ८० रुपये लिटर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कधी एक रुपया, कधी दहा पैसे करीत आता मात्र पेट्रोल दरवाढीने कहर केला आहे. उद्या (ता. २२) प्रतिलिटर पेट्रोलसाठी ८० रुपये १० पैसे मोजावे लागणार आहेत. नोव्हेंबर २०१७ पासून वाढत चाललेल्या पेट्रोल दराने आज लोकांना घाम फोडला आहे. दोन महिन्यांत लिटरमागे तीन रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनमालकांचे कंबरडे मोडणार आहे. 

नोव्हेंबरमध्ये पेट्रोल ७७ रुपये प्रतिलिटर होते. आता जानेवारीत याच पेट्रोलचे दर ८० रुपये १० पैसे झाले आहेत. जिल्ह्यात रोज सुमारे एक लाख लिटरहून अधिक पेट्रोलची विक्री होते. त्यामुळे जिल्ह्यातील दुचाकी आणि चारचाकीसह इतर वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. कधी ७६, कधी ७७, तर उद्या ८० रुपये १० पैसे दर ऐकल्यावर धक्का बसणार आहे. यापूर्वी चार ते पाच महिन्यांतून एकदा दरवाढ होत होती. आता प्रत्येक दिवशी दर बदलत राहतात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे जे दर आहेत, त्यावरूनच देशातील दर बदलत राहतात. 

मात्र सध्या दरकपात कमी आणि दरवाढ जास्त होत असल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा थेट महागाईवर परिणाम होतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढ म्हटल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो, हे वास्तव आहे. पेट्रोल दर आवाक्‍यात असावेत, अशी मागणी होत असताना रोज पेट्रोल दरवाढीचा आलेख चढता राहत आहे.

कोल्‍हापुरातील आजचा दर
पेट्रोल दर - ८० रुपये १० पैसे
डिझेल दर - ६६ रुपये १५ पैसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT