पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात 'यांना` हवी राष्ट्रवादीकडून उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, इचलकरंजीतून नगरसेवक नितीन जांभळे, हातकणंगलेतून अनिल कांबळे तर राधानगरीतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी हवी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी  मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राधानगरीतून अलीकडे एकमेकांना आव्हान देणारे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनीही उमेदवारीची मागणी केली.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व इच्छुकांची मते अजमावण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत श्री. पवार यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यातील दहा पैकी सात जागा काँग्रेससोबत आघाडी करताना राष्ट्रवादीला घ्याव्यात, अशीही मागणी अनेकांनी केली.

बैठकीत ‘उत्तर’मधून व्ही. बी. यांच्यासह राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर यांनीही उमेदवारीची मागणी केली. इचलकरंजीतून नगरसेवक नितीन जांभळे, हातकणंगलेतून अनिल कांबळे यांनीही विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली.

जिल्ह्यातील कागल, चंदगड, शिरोळ व राधानगरी या चार मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा आहे. यापैकी राधानगरीतून गेल्या काही दिवसांपासून ए. वाय. विरुद्ध के. पी. असा सामना चांगलाच रंगला आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एकमेकांना आव्हान देण्याची भाषा सुरू आहे. ‘राधानगरीला आता पर्याय आमचाच’ असे दोघांच्याही कार्यकर्त्यांकडून मेसेज व्हायरल केले जात आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत या दोघांनीही श्री. पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली. तथापि, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या मागे ताकद उभा करण्याचे आश्‍वासनही या दोघांनी दिले. पक्षप्रमुख म्हणून तुमचा जो निर्णय अंतिम असेल तो आम्हाला मान्य असल्याचे या दोघांनीही श्री. पवार यांच्यासमोर सांगितले.

आम्हाला जमेत धरत नाहीत
आमची कुरुंदवाडमध्ये मोठी ताकद आहे. नगरपालिकेत आम्ही सत्तेत आहोत; पण तालुक्‍यात आम्हाला जमेतच धरले जात नसल्याचे शिरोळचे चंगेजखान पठाण यांनी बैठकीत सांगितले. त्यांचा रोख हा या तालुक्‍याचे संभाव्य उमेदवार व ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे होता. 

या तीन जागा घ्या
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कागल, चंदगड, शिरोळ व राधानगरी या चार जागा आहेतच. काँग्रेसने आघाडी करताना सात जागांची मागणी केली आहे. आपणही तेवढ्याच जागा आघाडीत मागाव्यात, अशा भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. अतिरिक्त जागांत शाहूवाडी, उत्तर व इचलकरंजी या जागा मिळाव्यात, अशी मागणी केली.

पक्ष खिळखिळा, लक्ष घाला
जिल्ह्यातील खानविलकर, माने यांसारखी मोठी-मोठी घराणी पक्षातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे पक्ष विस्कळित तर झालाच आहे; पण खिळखिळाही झाला आहे. हा जिल्हा पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला होता, आज तशी अवस्था नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी स्वतः लक्ष घाला, अशी विनंती व्ही. बी. पाटील यांनी श्री. पवार यांच्याकडे केल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT