10th Students take the exam one and a half hours in advance Will have to be present at the center 
कोल्हापूर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ; शिक्षण खात्याने केल्या आहेत 'या' सूचना 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावी परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे थर्मल स्किनिंग केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दीड तास अगोदर परीक्षा 
केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून परीक्षा केंद्रावर वेळेवर येण्याची सूचना करावी, अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे. 


25 जुनपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार असून यावेळी कोरोनाच्या संकटामुळे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर केले जाणारे थर्मल स्किनिंग आणि इतर बाबतची माहिती विद्यार्थ्यांना 24 मार्चपर्यंत द्या, अशी स्पष्ट सूचना शिक्षण खात्याने केली आहे. त्यानुसार शिक्षकांना विद्यार्थ्यांशी मोबाईलवरुन संपर्क साधावा लागणार आहे. पेपरला सकाळी 10,30 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र विद्यार्थी वेळेवर आले तर सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांचे थर्मल स्किनिंग करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे थर्मल स्किनिंग करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 

परीक्षा केंद्रावर कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना अगोदरच असल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर होईल आणि विद्यार्थी आत्मविश्‍वासाने परीक्षा केंद्रावर येतील यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे. त्यानुसार शिक्षण खाते दोन दिवसात विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहे. यावेळी कोरोनाचे संकट असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या सुचनांचे विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. तसेच शिक्षण खात्याच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. 


परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचणे आवश्‍यक असून प्रत्येक पेपरवेळी विद्यार्थ्यांचे थर्मल स्किनिंग केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी गर्दी करु नये याकडेही लक्ष दिले जाणार आहे. 

-अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT