11 people from Kudche farm became corona free
11 people from Kudche farm became corona free 
कोल्हापूर

गुड न्यूज : कुडचे मळ्यातील 11 जण झाले कोरोनामुक्त

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात कोरोना संसर्ग ज्या भागातून सुरू झाला, त्या कुडचे मळा परिसरासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील तब्बल अकरा जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सर्वजण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. एक-दोन दिवसात ते आपल्या घरी परतणार आहे. शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीलाही सुरूवात झाल्यांने इचलकरंजीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

इचलकरंजी शहरात कुडचे मळ्यातून प्रथमच समूह संसर्गाला सुरुवात झाली. 55 वर्षाच्या यंत्रमाग कामगारांला प्रथम कोरोना संसर्ग झाला. त्यानंतर या परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. पाहता पाहता हा संसर्ग गुरुकन्नननगर, काडापूरे तळ, जुना चंदुर रोड, लिंबू चौक अगदी कर्नाटकातील बोरगावपर्यंत पोहोचला. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असतानाच आता मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरात गेले आठवडाभर नवीन कोरोना बाधीत रुग्ण मिळालेला नाही. 

दरम्यान, पहिला बाधित रुग्ण दगावला, पण कुडचे मळ्यातील अन्य रुग्ण हळू हळू घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत तब्बल 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये बोरगावमधील दाम्पत्याचाही समावेश आहे. या सर्वांना सध्या सीपीआर रुग्णालयामधून डिसचार्ज दिला असून सर्वजण संस्थात्मक अलगीकरण केंद्रात आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

अन्य रुग्णही कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहे. त्यामुळे शहरात बाधीच य आणि मृतांची संख्या वाढत असतांना कुडचे मळयातील अकराजणांसह परदेशातून परतलेला विद्यार्थी असे बाराजण कोरोनामुक्त झाल्यामुुळे इचलकरंजीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोना दृष्टीक्षेप (7 जुलै अखेर) 
- एकूण बाधीत रुग्ण.....85 
- पूर्वीचे कोरोनामुक्त......6 
- कुडचे मळा कोरोनामुक्त....11 
- विद्यार्थी कोरोनामुक्त....1 
- एकूण मयत.......7 

कोल्हापूर

कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT