Dengue Patient esakal
कोल्हापूर

Dengue Symptoms : कोल्हापूर जिल्ह्यात डेंगी, चिकुनगुनियाचे आढळले तब्बल 'इतके' रुग्ण; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

गेल्या २६ दिवसांत शहरात विविध भागांतील संशयित रुग्णांच्या घेतलेल्या रक्ताच्‍या नमुन्याच्या तपासणीनंतर ४९ डेंगीचे रुग्ण आढळले.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक आठवड्याला ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रातून संशयितांचे रक्त नमुने घेतले जातात. त्याची तपासणी शासकीय प्रयोगशाळेतून केली जाते.

कोल्हापूर : पावसामुळे नाले, डबकी पाण्याने भरत आहेत. यातून डासांची उत्पत्ती वाढत आहे. अशा स्थितीत गेल्या २५ दिवसांत जिल्हाभरात १२५ हून अधिक डेंगीचे रुग्ण (Dengue Patient) आढळले आहेत. डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने घर व परिसर स्वच्छ ठेवा, साठलेल्या पाण्याचा निचरा वेळीच करून डेंगीपासून बचाव करा, अशी जागृती आरोग्य विभाग करत आहे.

गेल्या २६ दिवसांत शहरात विविध भागांतील संशयित रुग्णांच्या घेतलेल्या रक्ताच्‍या नमुन्याच्या तपासणीनंतर ४९ डेंगीचे रुग्ण आढळले. चिकुनगुनियाचेही रुग्ण सापडत असून, त्याची संख्या आता १२ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) आरोग्य विभागाने शहरातील विविध भागांत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात डास अळ्यांचे प्रमाण आढळून येत आहे.

प्रत्येक आठवड्याला ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रातून संशयितांचे रक्त नमुने घेतले जातात. त्याची तपासणी शासकीय प्रयोगशाळेतून केली जाते. याशिवाय अनेकजण खासगी प्रयोगशाळेतूनही तपासणी करून घेत असले तरी त्याचा अहवाल ग्राह्य धरला जात नाही, तरीही त्यातून येणाऱ्या अहवालांमध्ये डेंगीसदृ‍श रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले असून, गेल्या २६ दिवसांत एकूण ५२७ नमुने तपासण्यात आले. त्यात ४९ डेंगीचे, तर १२ चिकुनगुन्याचे रुग्ण आढळले.

दोन्ही प्रकारचे रुग्ण सापडण्याचे परिसर वेगवेगळे आहेत. त्यामध्ये कसबा बावडा, राजारामपुरी, मुक्तसैनिक वसाहत, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, टेंबलाईवाडी, जरगनगर, रंकाळा परिसर, फुलेवाडी, फिरंगाई, सिद्धार्थनगर, पंचगंगा रुग्णालय परिसर, उद्यमनगर, मंगळवार पेठ, व्हिनस कॉर्नर आदी परिसर आहेत. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले नसले तरी त्याचे कमी-अधिक प्रमाण आहे. थोड्या फार फरकाने ग्रामीण भागातील गावागावांत डेंगी किंवा डेंगीसदृश रुग्ण आढळत आहेत. संशयित रुग्णांचे रक्त तपासणी करण्यात येत आहेत, तसेच ग्रामीण पंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याकडून घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेतली जात आहे.

काविळीचेही रुग्ण

डेंगी, चिकुनगुनियाबरोबरच आयसोलेशन रुग्णालयात दररोज काविळीचे एक ते दोन रुग्ण दाखल होत आहेत. त्यात ग्रामीणमधील रुग्णांचाही समावेश आहे. त्यामुळे याबाबतही नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीरांचे आवाहन

  • आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा

  • घरातील भांडी रिकामी करून कोरडी ठेवावीत

  • साठलेल्या पाण्यात किंवा ओल्या भांड्यांत डासांची अंडी चिकटलेली असतात, ती नष्ट करावीत

  • कुंड्या, करंवटी, प्लास्टिक साधने, टायर, फ्रीज कंटेनरमध्ये पाणी साठू देऊ नये

  • पाण्याचे साठे झाकून ठेवावेत

  • ईडिस इजिप्ती डासामुळे डेंगी होतो. तो दिवसा चावतो

  • त्याच्या पाठीवर झेब्रासारखे पट्टे असतात

  • डास चावू नयेत, यासाठी लांब बाह्यांचे कपडे वापरावेत

  • डेंगीचा ताप येतो. चार-पाच दिवसांत ताप कमी होतो

  • वेळीच उपचार घेतले नाही तर रुग्ण गंभीर अवस्थेत जातो

  • लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवावे, पाणी भरपूर प्यावे

  • जनतेच्या सहभागाशिवाय डेंगीचा प्रादुर्भाव कमी होणे अशक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT