20 trees dangerous on Kale 
कोल्हापूर

कळे, बाजारभोगाव रस्त्यावर 20 झाडे धोकादायक 

धनाजी पाटील

पुनाळ : लवकरच मान्सून सुरु होत आहे. पण पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्त्यांवर असणारी धोकादायक झाडे तोडून संभाव्य धोका टाळणे गरजेचे बनले आहे. कळे व बाजारभोगाव या मुख्य बाजारपेठा असणाऱ्या रस्त्यावरील 20 झाडे धोकादायकरीत्या उभी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वाहनधारकांची आहे. 

कळे येथून बाजारभोगाव या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार गर्द झाडे उभी आहेत. गतवर्षी काटेभोगाव फाट्यावरील धोकादायक झाडे तोडुन संभाव्य धोका टाळण्यात आला होता. र यामध्ये कळे, काटेभोगाव, वारनुळ, पोहाळे, बाजारभोगाव आदी गावांच्या फाट्यावर किमान 20 वृक्ष धोकादायक स्थितीत उभे आहेत. यामध्ये जांभळ, काटेसावर, आंबा, सावलीच्या झाडांचा समावेश आहे. काही ठिकाणी वृक्ष वठलेले उभे आहेत. ते कधीही कोसळु शकतात.

काही ठिकाणी वीज पडून जीवंत झाडे उभी चिरलेली आहेत. जाता-येता करकर आवाज करत असल्याने भितीदायक स्थिती आहे. काही झाडे मुळातून जळालेल्या अवस्थेत उभी आहे. काही झाडांना सभोवार साल काढुन रात्रीची तोडायची या उद्देशाने धोकादायक स्थितीत उभी आहेत. या झाडांपैकी एक मोठे डेरेदार जांभळीचे झाड झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतात कोसळले. काटेभोगाव जवळील रस्त्याकडेचे हे झाड रात्री कोसळल्याने जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांच्या ऊसशेतीचे मात्र नुकसान झाले. 

या रस्त्यावरुन नियमित प्रवास करतो. या रस्त्यावरील धोकादायक झाडे पाहुन वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन चालवावे लागते. या रस्त्यावर वाहतुक जास्त असल्याने धोकाही अधिक आहे. संबंधीत विभागाने वेळेत लक्ष देऊन धोकादायक झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करावी. 
- अरुण तळेकर, उपसरपंच, किसरुळ. 


पावसाळ्यापुर्वी या मुख्य रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडणे गरजेचे बनले आहे. या रस्त्यावरील वाहतुक या ना त्या कारणाने धोकादायक झाली आहे. संबंधीत विभागाने वेळीच लक्ष देऊन संभाव्य धोका टाळावा. 
- रवींद्र चौगले, पन्हाळा पंचायत समिती सदस्य. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT