25 new corona positive cases in kolhapur district
25 new corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

Big Breaking-कोल्हापुरात कोरोनाचा कहर ; दिवसभरात तब्बल ५९ नव्या रूग्णांची भर 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सांयकाळी ३४ रूग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतरा आता आणखी २५ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज दिवसभरात तब्बल ५९ नव्या रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरातील ५९ रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या ११२८ वर पोहोचली आहे. 

आता आलेल्या नव्या २५ पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये चंदगडमधील १७, कोल्हापूर शहर एक, करवीर एक, शिरोळ तीन तर शाहुवाडीतील दोघांचा समावेळ आहे. 

सायंकाळचे ३४ रूग्ण 
सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये पन्हाळा आठ, कसबा बावडा एक, गडहिंग्लज चार, हातकणंगले एक,  शिरोळ दोन, कागल एक, गांधीनगर एक, टोप एक, कोल्हापूर शहर पाच, गारगोटी एक, राधानगरी एक, शाहुवाडी
 एक तर इचलकरंजीतील सहा व्यक्तींचा समावेश आहे.  

शिवाजी पार्कात पोलीस अधिकाऱ्यांची पत्नीच कोरोना पॉझीटीव्ह 
 
शिवाजी पार्कात रहाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल आज पॉझीटीव्ह आला. संबंधित दाम्पत्य पुण्याहून दोन दिवसांपुर्वी कोल्हापुरात आले होते. 

आज दिवसभरात जिल्ह्यातील 34 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. त्यात या पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा समावेश आहे. संबंधित कुटुंब शिवाजी पार्कात रहात असले तरी पुण्याहून आल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या दोघांचेही घशातील स्त्रावाचे नमुने काल तपासणीसाठी सीपीआर रूग्णालयात दिले होते. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझीटीव्ह आला. अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित दाम्पत्य हे कोल्हापुरात आल्यापासून संस्थात्मक अलगीकरण कक्षात असल्याने शिवाजी पार्कातील त्यांच्या घराशेजारील परिसर सील करण्याचा प्रश्‍न आला नाही. 

..

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT