कोल्हापूर

"कासारी'त 36 टक्के पाणीसाठा 

सागर चौगले

माजगाव :  पश्‍चिम पन्हाळा तालुक्‍याला व शाहूवाडी तालुक्‍यातील काही गावांना सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणाऱ्या कासारी मध्यम (गेळवडे) प्रकल्पात 17 मे अखेर 36 टक्के पर्यंत पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 7 टक्के जादा आहे.

तसेच कासारी पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या उर्वरित पाच लघु प्रकल्पात सरासरी 18 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा आहे. सद्या सर्व धरणातील शिल्लक पाणीसाठा पाहता हा पाणीसाठा लाभक्षेत्रासाठी जून अखेर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे इमारत देखभाल शाखा अभियंता (कोल्हापूर) संभाजी काटे यांनी दिली आहे. 

कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी, व नादांरी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. गेळवडे हे प्रमुख धरण असून याची पाणी साठवण क्षमता 2.77 टीएमसी आहे. या प्रकल्पाखाली शाहूवाडी तालुक्‍यातील 20 गाव व पन्हाळा तालुक्‍यातील 41 गावांना उपसा सिंचन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या मधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी नदीवर जागोजागी सुमारे 14 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. सुमारे 9 हजार 458 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. 


इतर प्रकल्पात शिल्लक साठा असा 
(कसांत गतवर्षीचा शिल्लक साठा) : 
पडसाळी लघु पाटबंधारे प्रकल्पात 26 टक्के (17 टक्के), पोबरे 35 टक्के (29), कुंभवडे 27 टक्के (23), केसरकरवाडी 23 टक्के (18), नांदारी 18 टक्के (17), इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

कासारी पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या सर्व धरणात सध्या मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पावसाळा लांबला तरीही जून अखेर या सर्व धरण पाणलोट लाभक्षेत्रात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. 
- संभाजी काटे, इमारत शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT