3rd day the pooja of dakkhancha raja jotiba with presenty of villege prople in kolhapur 
कोल्हापूर

जोतिबाची तिसऱ्या दिवशी पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील तिसऱ्या दिवशी सकाळी पाच पाकळी सोहन कमळा पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकरी आणि पुजारी यांनी बांधली. जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास पारंपरिक महत्त्व असून याठिकाणी नवरात्र उत्सव दिमाखात साजरा केला जातो. 

यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे हा सण साध्या पद्धतीने साजरा केला जातो आहे. आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट, घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थिती मध्ये धूपारतीचा सोहळा ढोल, पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला. यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव हिंडे श्रीचे पूजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी दहा वाजता हा सोहळा जोतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गेला. 

यावेळी गावातील महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी  प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. व या सोहळ्याची सांगता झाली. यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर व परिसरात आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला आहे. रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा पाहताना मन प्रसन्न होत असल्याचे गावकरी सांगत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT