60 food recipe from jaggery kolhapur
60 food recipe from jaggery kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : गुळापासून बनले ६० हून अधिक पदार्थ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या उद्योजकता, कौशल्य विकास केंद्रामार्फत गुळापासून एक-दोन नव्हेतर साठपेक्षा अधिक पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण, मार्गदर्शन गूळ उद्योजकांना दिले जाते. गूळ कँडी, पावडर, काकवी, गुळाचा चहा, गुळाची चॉकलेट अशा पदार्थांचा समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठातील उद्योजकता, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव गुळवे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. स्वतः डॉ. गुरव वीस वर्षांहून अधिक काळ गुळावर संशोधन करीत आहेत. त्यांनी २५ गुळवे प्रशिक्षण शिबिरे घेतली. सध्या सहा गूळ प्रकल्प कार्यरत आहेत. यात सांगली, मजले, रहिमतपूर, पंचतारांकित एम.आय.डी.सी, नेज, कणेरी मठ येथील गूळ-उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे. डॉ. गुरव म्हणाले, ‘‘शरीरासाठी लाभदायक गुळापासून विविध पदार्थ बनवण्याचा व्यवसाय वाढत आहे. या व्यवसायातून रोजगारनिर्मितीही होत आहे. सध्या कोल्हापूरजवळील ५ ते १० गुऱ्हाळ घरांवर कार्यशाळा घेण्याचा मानस आहे. गुळात साखरेची भेसळ करून गोडवा वाढवण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. अशा प्रकारांपासून शेतकऱ्यांनी दूर राहायला हवे. गुळापासून बनणाऱ्या पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी तरुण उद्योजक, बँका आणि शासनाची सकारात्मक भूमिकांची सांगड आवश्यक आहे.

हा व्यवसाय सुरू करणे सुरुवातीला थोडे खर्चिक असले तरी तरुणांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. गुळापासून बनवलेल्या उत्पादनांचा उपयोग सणा-सुदीला भेट देण्यासाठीही होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होते.’’ डॉ. गुरव २०१३ मध्ये गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे मार्केटिंग करण्यासाठी दुबईला गेले होते.

असाही गूळ

गुळाची ढेप, पावडर, गुळाचे वेगवेगळ्या आकाराचे क्यूब (घन), काकवी, मोदक, गुळाचे ग्रॅन्युल्स, गुळाचे कॅडबरीसदृश चॉकलेट्स, गुळाचे सरबत, गुळाची बिस्किटे, नाचणी-गुळाची बिस्किटे, गूळ चहा प्री-मिक्स, गूळ कॉफी प्री-मिक्स, गूळ लिंबूपाणी, चिक्की, चणा डाळ, गूळ सुजी, डार्क चॉकलेट, गूळ कँडी ज्यात इलायचीसह नऊ वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम तयार केले आहे. चिरमुरा लाडू, राजगिरा लाडू, बुंदीचे लाडू, नाचणीचे लाडू, गुळाची रेवडी बनवले जातात. हळद, गुळ पावडर एकत्र करून त्यापासून कॅप्सूल तयार केली आहे. मिकी माऊस, ससा, बैल, हत्ती आदी खेळणी, भेटवस्तूही गुळापासून बनविता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT