Vishalgad Encroachment Dispute esakal
कोल्हापूर

मोठी बातमी! विशाळगडावरील तब्बल 70 अतिक्रमणे जमीनदोस्त; संभाजीराजेंच्या आंदोलनानंतर प्रशासनाची कारवाई

Vishalgad Encroachment Dispute : विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या दशकभरापासून आंदोलन सुरू होते. गेल्या आठवड्यात हिंदुत्ववादी (Hindu Association) कार्यकर्त्यांनी विशाळगडावर महाआरती केली.

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे (Vishalgad Encroachment Dispute) काढण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. कालपासून ही अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. पहिल्या दिवशी ७० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सायंकाळी सहापर्यंत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू होती.

विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या दशकभरापासून आंदोलन सुरू होते. गेल्या आठवड्यात हिंदुत्ववादी (Hindu Association) कार्यकर्त्यांनी विशाळगडावर महाआरती केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ‘चलो विशाळगड’चा नारा दिला. त्यांनी प्रशासनाबरोबरच्या बैठकीला जाणेही टाळले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ते, रविवारी (ता. १४) दुपारी बारा वाजता विशाळगडावर पोहचले. यावेळी त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना न्यायालयात असणारी अतिक्रमणे सोडून अन्य अतिक्रमणे पाडण्याचे आश्वासन दिल्यावर त्यांनी आंदोलन थांबवले. त्यानंतर राज्य प्रशासनाने शासकीय महाभियोक्ता यांच्याकडून अतिक्रण निर्मूलनाबाबत अभिप्राय मागवला होता. याचिकाकर्त्यांना स्थगनादेश आहे, ती वगळून इतर अतिक्रमणे काढता येतील, असा अभिप्राय त्यांच्याकडून आला.

संबंधित अभिप्राय मिळताच प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. मोहीम सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत राबविण्यात आली. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी विशाळगड, तसेच किल्ले विशाळगड ते गजापूर चेकपोस्ट क्षेत्रामध्ये संचारबंदी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आला. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ७० अतिक्रमणे काढण्यात आली. त्यात व्यावसायिक कारणांसाठी असलेली व स्थगनादेश नसलेल्या अतिक्रमणांचा समावेश होता. या मोहिमेमध्ये महसूल विभागाचे ९० कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह १५० मजूर सहभागी होते.

पुरातत्त्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. पोलिस दलाचे २५० अधिकारी - कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी होते. मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळा-शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलिस अधिकारी शाहूवाडी अप्पासाहेब पवार, तहसीलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता धनंजय भोसले, शाहूवाडीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी सहभाग नोंदविला. मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

SCROLL FOR NEXT