कोल्हापूर

कोल्हापूरात वर्षभरात झाली ८६९ कोटींची गुंतवणूक

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील चित्र; ‘एमआयडीसी’चा हातभार

सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील चित्र; ‘एमआयडीसी’चा हातभार

कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत(midc kolhapur) वर्षात तब्बल ८६९ कोटींची गुंतवणूक झाली आहे. येथे सुमारे चार हजार २३ कामगारांना रोजगार (employment)उपलब्ध होतो. सुमारे ३७ हेक्टर जमीन ‘एमआयडीसी’च्या (MIDC)माध्यमातून नवीन उद्योजकांना देण्यात आली आहे. गेल्या अकरा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या वर्षात याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (MIdc) नियोजन महत्त्वाचे ठरले आहे.

कोल्हापूर(kolhapur) औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील फाउंड्री, टेक्स्टाईल, ऑटोमोबाईलसह अन्य मोटारींच्या छोट्या-मोठ्या सुट्या भागांचा पुरवठा करणारे कोल्हापूर म्हणून जगभरात ख्याती आहे. येथे तयार झालेले उत्पादन १०० हून अधिक देशात जाते. मात्र, याच औद्योगिक विस्ताराला अपुऱ्या जागेमुळे मर्यादा आल्या आहेत. जिल्‍ह्यात शिवाजी उद्यमनगरानंतर पुढे तीन औद्योगिक वसाहती झाल्या. या ठिकाणी काही उद्योजकांनी जागा आरक्षित केली. मात्र, तेथे महामंडळाच्या नियमानुसार वेळेत बांधकाम केले नाही. त्यामुळे त्यांचे प्लॉट काढून घेण्यात आले. गेल्या दहा वर्षांत ही उद्योगनगरी झपाट्याने वाढल्याने काढून घेतलेल्या प्लॉटचीही विक्री करण्यात आली आहे.आता मागणी वाढत असून, प्लॉट देण्यावर मर्यादा आहेत. म्हणूनच कित्येक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या गडहिंग्‍लज आणि हलकर्णी औद्यगिक विकासमध्ये नव्याने विस्तार होत आहे. फाउंड्री, टेक्स्टाईलसह अन्य ऑटोमोबाईल सेक्टरमधील उद्योग येथे उभे राहत आहे. विशेष करून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत हे सर्व उद्योग उभारले जात आहेत.

कोल्हापुरात आणखी काही उद्योग येण्यासाठी तयार आहेत. त्यांच्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचेही नियोजन सुरू आहे. राज्यपातळीवरील हा निर्णयही जानेवारीत होण्याची शक्यता एमआयडीसी कार्यालयातून वर्तविली जाते. सध्या शहर परिसरात जागा संपल्यानेच आता गडहिंग्लज आणि हलकर्णी येथील वसाहत उद्योजकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

कोल्हापुरात आजही गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजक उत्सुक आहेत. ८६९ कोटींची गुंतवणूक केवळ ११ महिन्यांत कोल्हापुरात आली. विशेष करून ही गुंतवणूक पंचतारांकित औद्यौगिक वसाहतीत झाली आहे. ‘एमआयडीसी’तून उद्योजकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले.

- राहुल भिंगारे,

प्रादेशिक अधिकारी, ‘एमआयडीसी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT