Accident Esakal
कोल्हापूर

Kolhapur Accident: मुसळधार पावसामुळे समोरासमोर धडक, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; दोघे ठार!

Latest Accindet News : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - सचिन चौगुले हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करतात

सकाळ वृत्तसेवा

Latest Marathi News : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही ठार झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाटा (ता. करवीर) येथील हॉटेल दुर्गामाता समोर दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

सचिन ऊर्फ पोपट कुमार चौगुले (वय ४०, रा. किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व सौरभ संजय साळोखे (वय ३०, रा. हरिपूजापुरम नगर, नागाळा पार्क कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत दुचाकीस्वार सुमारे शंभर फूट अंतरापर्यंत घसरत जाऊन पडला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - सचिन चौगुले हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करतात. आज दुपारची शिफ्ट असल्याने ते घरातून बाहेर पडले.

शिये फाटा येथे अपघातात दोघे ठार

साडेतीनच्या सुमारास शिये फाटा येथून ते महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी सौरभ साळोखे हे आपल्या दुचाकीवरून (एमएच ०२, इएम ०१२३) कोल्हापूरकडून सादळे-मादळेकडे निघाले होते. मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोघांचीही गडबड होती. रस्ता दुभाजकामध्ये वळणावरील जागेत दोघेही अचानक समोरासमोर आल्याने त्यांची धडक झाली.

या अपघातात सचिन चौगुले हे महामार्गावर मध्यभागी डोक्यावर जोरात आपटले व जागीच ठार झाले; तर सौरभ साळोखे हे महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे शंभर फूट अंतरावर घसरत जाऊन पडले.

त्यांची दुचाकी तेथून दीडशे फूट अंतरावर जाऊन पडली. यामध्ये सौरभही गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

सचिन चौगुले हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत कामाला होते. किणीहून-शिये फाटा असा त्यांचा प्रवास मिळेल त्या वाहनाने असायचा. शिये फाटा येथून ते चालत किंवा लिफ्ट घेऊन कंपनीत वेळेत हजर असायचे. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील व तीन विवाहित बहिणी आहेत. सौरभ साळोखे यांच्या वडिलांचा शिये येथील हनुमाननगर येथे सौरभ एंटरप्राईजेस या नावाने ट्रेडिंग व्यवसाय आहे. सौरभ हे सिव्हिल इंजिनियर आहेत. सादळे-मादळे येथे त्यांचे फार्म हाउस आहे. सध्या तेथे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने सौरभ तिकडेच निघाला होता. त्याचा लहान भाऊ परदेशात शिक्षण घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT