accumulated four tons of garbage, plastic
accumulated four tons of garbage, plastic 
कोल्हापूर

सोशल डिस्टन्स ठेवत, जमा केला चार टन कचरा, प्लास्टिक 

डॅनियल काळे

कोल्हापूर : शहरात आज झालेल्या महास्वच्छता अभियानात चार टन कचरा व प्लास्टिक जमा झाले. मोहिमेचा आज 63 वा रविवार होता. मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी सहभागी झाले. 

स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, "राम मराठा'चे सुशांत पोवार, ऐश्‍वर्या पोवार, आम आदमी अध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष उत्तम पाटील, संघटनमंत्री सूरज सर्वे, आदम शेख, महेश घोलपे, विशाल वाठारे, सचिन डाफळे, राज कोरगावकर, सुभाष यादव, बसाप्पा हदिमनी, सविराज पाटील, आनंदराव वणिरे, स्वच्छतादूत अमित देशपांडे व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. ही मोहीम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 
कसबा बावडा झूम प्रकल्प परिसरात हवा शुद्ध ठेवणाऱ्या, विषारी वायू शोषून घेणाऱ्या 15 ते 20 फुटी झाडांचे पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. 

यात महारुख, तामण, पुत्रंजीवी, सातवीन, कडुलिंब, जांभूळ, वड, पिंपळ, हेळा, सोनचाफा, बिट्टी, मोरआवळा, करंज, बेल अशा देशी झाडांचा समावेश होता. गंगावेस येथील शाहू उद्यान गार्डन येथे "राम मराठा'चे सुशांत पोवार यांच्या पत्नी ऐश्‍वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरा फाउंडेशनने वृक्षारोपण केले. यावेळी राम मराठाचे सुशांत पोवार, स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, उपाध्यक्ष अजिंक्‍य पाटील, प्राजक्ता माजगावकर, अपूर्वा खांडेकर, प्रणव कागले, पीयूष हुलस्वार, आदित्य पाटील, पिंटू संकपाळ, सरफराज मिद्या व स्वरा फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

जयंती नदी संप व पंप हाऊस परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, शाखा अभियंता आर. के. पाटील उपस्थित होते. ही स्वच्छता मोहीम पंचगंगा नदीघाट, रंकाळा टॉवर ते डी मार्ट मेन रोड, कळंबा फिल्टर हाऊस ते मध्यवर्ती कारागृह मेन रोड व सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी, जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर, रंकाळा तलाव मेन रोड, रिलायन्स मॉल मागील बाजू जयंती नदी, भगवा चौक ते महावीर कॉलेज मेन रोड व मोतीनगर मेन रोड या ठिकाणी केली. 

टॅंकरने औषध फवारणी... 
स्वच्छता मोहिमेत 3 जेसीबी, 7 डंपर, 6 आरसी गाड्या, 3 औषध फवारणी टॅंकर यांचा वापर करण्यात आला. महापालिकेच्या 80 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने मोहीम राबविली. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT