Action in bauxite excavation case Three farmers fined Rs 41 lakh 
कोल्हापूर

राधानगरीतील तीन शेतकऱ्यांना ४१ लाखांचा दंड

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्‍यात अवैधपणे सुरू असलेल्या बॉक्‍साईट उत्खननप्रकरणी तीन शेतकऱ्यांना सुमारे ४० लाख ९१ हजार रुपये दंडाची कारवाई राधानगरी तहसीलदारांनी केली आहे. यात तळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवला होता.प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांत याप्रकरणी कारवाई सुरूच ठेवली आहे.

राधानगरी अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या मिसाळवाडी (जुने करंजे) येथील उत्खनन प्रकरणी वन्यजीव विभागाने ट्रक, पोकलॅंड आणि दोन ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर महसूल विभागाने दंडाची कारवाई केली. मिसाळवाडी (जुने करंजे) येथे १०० टन बॉक्‍साईटचा साठा सापडला होता. शेतकरी वसंत रामचंद्र राऊत व रोहन शिर्के यांना आठ लाख नऊ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. तळगाव क्षेत्रातील सदाशिव पांडुरंग गिरीगोसावी यांना ३० लाख २३ हजार २०९ रुपये दंड केला. या खणीवर ७७३ टन बॉक्‍साईट सापडले. 


चाफेवाडी -धुमाळवाडी परिसरात सुभाष हातकर यांच्या शेतात उत्खनन सुरू होते. तेथे ३२ टन बॉक्‍साईट आढळले. हातकर यांना दोन लाख ५९ हजारांचा दंड केला आहे. या सर्वांना नोटिसा बजावल्याचे तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितले. दुसरीकडे वन्यजीव विभागाने मिसाळवाडी येथील उत्खनन प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली असून, त्यानंतर याबाबत पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे यांनी दिली.

निसर्गप्रेमींकडून स्वागत
अभयारण्य आणि त्याच्या बाजूला असलेल्या संवेदन क्षेत्रांत चोरून बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. यामुळे या परिसरातील ध्वनी, पाणी प्रदूषण होत असल्यावरही प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. याचे निसर्गप्रेमींकडून स्वागत होत आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT