All sanctuary, tiger project lockdown kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सर्व अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प लाॅकडाउन

राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (जि. कोल्हापूर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, सागरी जैवविविधता केंद्रे यापुढेही नवे आदेश येईपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. यंदा अशा बंद आदेशाचा हा तिसरा टप्पा असून, यामुळे निसर्ग पर्यटनावर गदा आली आहे. 

एकीकडे पर्यटकांचा संचार नसल्याने मुक्त वावर असलेले जंगली प्राणी तर दुसरीकडे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पर्यटकांना कोरोनाचा साखळदंड अशी परिस्थिती यंदा आहे. परिणामी, कोल्हापूर विभागातील अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना बंदच राहणार आहेत. याबाबत राज्याचे मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सर्व वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल यांना तसे आदेश दिले आहेत. 

राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये तसेच किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र यामध्ये पावसाळ्यानंतर पर्यटकांची तोबा गर्दी असते. दैनंदिन दगदगीतून विरंगुळा हवा असेल तर निसर्गासारखा दुसरा पर्याय नाही, हे अलिकडे लोक जाणू लागले आहेत. परिणामी, बहुतांशी लोकांचा ओढा अशा ठिकाणी असतो. यंदा निसर्ग पर्यटनावर पहिल्यापासूनच गदा आली आहे. लांबलेला पावसाळा, त्यानंतर तब्बल महिनाभर उशिरा सुरू झालेली अभयारण्ये-उद्याने, मध्येच प्राणी गणनेसाठी केलेला मज्जाव आणि पुन्हा 18 मार्चपासून कोरोनामुळे पर्यटकांना घातलेला संचारबंदीचा साखळदंड, यामुळे निसर्गप्रेमींमध्ये प्रचंड निराशा आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने 18 मार्चपासून 31 मार्चपर्यंत अशा ठिकाणी पर्यटकांना बंदी होती. त्यानंतर लॉकडाउन व संचारबंदीमुळे पुन्हा दुसरा आदेश काढून महिन्याने वाढ करण्यात आली. ती बंदी 31 एप्रिलपर्यंत आहे. आता कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेता वनविभागाने पर्यटकांसाठी अशा स्थळी जाण्यासाठी पुढील आदेशापर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. 

कोल्हापूर विभागातील राधानगरी -दाजीपूर, सागरेश्वर अभयारण्य आणि चांदोली व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना जाता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT