All but two lacs of water levy recovered 
कोल्हापूर

पाणीपट्टीचे सव्वा दोन लाख वसुल 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी आज शहरातील विक्रमनगर, शिवाजी पार्क, टाकाळा झोपडपट्टी, जुना बुधवार पेठ, ब्रम्हपूरी, बीडी कामगार वसाहत, रिंगरोड, बागवान गल्ली, देशमुख हायस्कूल, परिसरात वसुली मोहिम राबवून सुमारे सव्वा दोन लाख वसूल केले. 

थकीत पाणी पट्टीची रक्कम वसुलीसाठी शहर पाणी पुरवठा विभागातर्फे 5 वसुली पथके तयार केली असून यात फक्त महिलांचे एक पथक कार्यरत आहे. या पथकातर्फे वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नोटीस पाठविल्या आहेत. या थकबाकीदारांनी मुदतीत थकीत रक्कम भरली नाही तर त्यांचे पाणी कनेक्‍शन खंडीत करुन संबंधितांचे मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही वसुली मोहीम येथून पुढेही सुरु राहणार आहे. 

ही कारवाई अतिरिकत आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता भास्कर कुंभार व पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यावेळी पथक प्रमुख के.टी.पाटील. स्वाती शहा, ज्योती सुतार, रतन पराडकर, शोभा पाटील, पार्वती पाटील, संजना पाटील, राजर्श्री पटील, अर्चना पोवार, पूजा माळी, रेखा पडळकर, संपदा पांढरे, महिला कर्मचाऱ्यांनी व भागातील मिटर रिडर्स यांनी भाग घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT