कोल्हापूर

चालकांचाही खोळंबा; अपुऱ्या रुग्णवाहिकांमुळे सेवेत येतोय अडथळा

गाडीत ऑक्सिजन अभाव; एकावेळी येतात तीन ते सहा कॉल

शिवाजी यादव

कोल्हापूर : दोन महिन्यात कोरोनाबाधितांची (covid-19 patients) संख्या वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड, (oxygen bed) व्हेंटिलेटर बेडच्या (ventilator) तुटवड्याबरोबर आता रुग्णवाहिकांचाही तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात ३० रुग्णवाहिका (ambulance) आहेत; मात्र रुग्णवाहिकांसाठी तातडीने ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनच्‍या प्रतीक्षेत काही रुग्णवाहिका थांबून राहतात, सेवा देण्यासाठीही रुग्णवाहिका चालकांचा खोळंबा होतो. (kolhapur district)

गंभीर अवस्थेतेतील रुग्णांना कोल्हापूरला उपचाराला पाठविले जाते . त्यासाठी जिल्ह्यांर्गत रुग्ण वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात ३० खासगी रुग्णवाहिका (private ambulance) आहेत. यातील २५ हून अधिक रुग्णवाहिकांना ऑक्सिजनची सोय आहे; तर सात रुग्णवाहिका कार्डियाक आहेत. गंभीर रुग्णांचीही वाढती संख्या असल्याने घरातून रुग्ण दवाखान्यात नेणे, एका दवाखान्यातून (hospitals) दुसऱ्या दवाखान्यात नेणे किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रोज एकावेळी तीन ते सहा कॉल एका रुग्णवाहिकेला येतात. एकाच वेळी जावे कोठे? असा प्रश्न पडतो.

रुग्णवाहिका चालक जवळच्या अंतरात विशेषतः जिल्ह्यार्तंगत रुग्ण वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे दूरच्या अंतरावर रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात साडेसात हजारांवर बेडची सुविधा आहे. बहुतेक दवाखान्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची सुविधा आहे. मात्र गंभीर रुग्णांची वाढती संख्या असल्याने अनेकदा व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, अशा वेळी रुग्णाला अन्य दवाखान्यात न्यावे लागते, तेव्हा रुग्णवाहिकाचे भाडे वाढते यातून वाद निर्माण होत आहे.

मृतदेह नेणे गैरसोयीचे

परजिल्ह्यात किंवा परराज्यातील गंभीर व्यक्तीं तसेच मृतदेहही रुग्णवाहिकेतून नेला जातो. चालक नियमित भाडे घेऊन किंवा मृतदेह नेतात मात्र अनेकदा काही लोकांकडे पैसे पुरसे नसतात किंवा वाढीव भाडे मागण्यासाठी वाद घालणे शक्य नसते. अशा वेळी रुग्णवाहिका चालकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अनेक रुग्णवाहिका चालक परराज्यातील भाडे नाकारत असल्याचे सांगण्यात येते.

अव्वाच्या सव्वा भाडे

काही मोजके रुग्णवाहिका चालक वाहक भाडे सुरवातीपासूनच जास्त सांगतात. रुग्णवाहिका सहज मिळणार नाही, याचा अंदाज घेऊन काही रुग्णवाहिका संचालक अव्वाच्या सव्वा भाडे मागत असल्याचेही सांगण्यात येते.

"रुग्णसंख्या जास्त व रुग्णवाहिका मोजक्याच आहेत. गंभीर कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय द्यावी लागते; मात्र रुग्णवाहिकांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या काळात गंभीर रुग्णांची वाहतूक करण्यास नकार देण्याची वेळ येते."

- प्रशांत पाटील, मालक, जनसेवा रुग्णवाहिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT