Pohale Village Jyotiba Dongar esakal
कोल्हापूर

Jyotiba Dongar : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी आढळले दीड टनाचे प्राचीन दगडी पर्जन्यमापक यंत्र

पूर्वी दगडांपासून पर्जन्यमापक यंत्र तयार होत असत. तीन फूट व्यास व दहा फूट उंचीचा दगडाला उखळासारखा आकार दिला जात असे.

निवास मोटे

पर्जन्यमापक यंत्र प्राचीन काळापासून आहे. दीड टन वजनाच्या यंत्राची नव्या पिढीला ओळख होण्यासाठी जतन करण्याची गरज आहे.

जोतिबा डोंगर : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) गावातील रांगट नावाच्या परिसरात प्राचीन अंदाजे दीड टन वजनाचे दगडी पर्जन्यमापक यंत्र जमिनीत रोवलेल्या स्थितीत आहे. जखिन नावाच्या शिवारात असलेल्या दगडी पर्जन्यमापकात पावसाची (मोजणी) नोंद व्हायची, असे वयोवृद्ध सांगतात. यंत्र पडून असून त्याचे जतन करणे गरजेचे आहे.

पूर्वी दगडांपासून पर्जन्यमापक यंत्र तयार होत असत. तीन फूट व्यास व दहा फूट उंचीचा दगडाला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचूकता येण्यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई.

उखळासारख्या आकाराच्या तळाशी छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. पाऊस पडताना वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जात असे. साठलेल्या पाण्याचे दैनंदिन, साप्ताहिक मोजमापानंतर छिद्रातून पाणी सोडले जात असे. पूर्वी चिपटे, मापटे, शेर, पायली या परिमाणात मोजमाप होई. प्राचीन पर्जन्यमापक यंत्राचे जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

पर्जन्यमापक यंत्र प्राचीन काळापासून आहे. दीड टन वजनाच्या यंत्राची नव्या पिढीला ओळख होण्यासाठी जतन करण्याची गरज आहे.

-वैशाली पाटील, ग्रामपंचायत सदस्या, पोहाळे तर्फ आळते

दगडी पर्जन्यमापक यंत्र पूर्वजांचा ठेवा आहे. पन्हाळा किंवा जोतिबा डोंगरावर यंत्र भाविक व पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवावे. युवा पिढीने यंत्राचे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत.

-संग्राम गायकवाड, पर्यावरणप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT