Annapurna will complete the construction of Sugar in a month 
कोल्हापूर

अन्नपूर्णा शुगरची उभारणी महिन्यात पुर्ण करणार ः संजयबाबा घाटगे

रमेश पाटील

म्हाकवे कोल्हापूर,  : अन्नपूर्णा साखर कारखान्याची उभारणी महिन्याभरात पुर्ण होईल. सभासद, कार्यकर्त्यांची अस्मिता असणाऱ्या या साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक असेल,असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष संजय घाटगे यांनी केले. 
केनवडे (ता.कागल) येथील अन्नपुर्णा शुगर ऍन्ड जॅगरी वर्क्‍सच्या चिमणी उभारणी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. वाय. पाटील म्हाकवेकर होते. यावेळी अरुंधती घाटगे, एस. व्ही. पाटील, शिवसिंह घाटगे उपस्थित होते. 
संजय घाटगे म्हणाले,""कष्टकरी, श्रमजीवी कार्यकर्त्यांच्या बळावरच आमची राजकीय वाटचाल सुरू आहे. कारखान्याचा उभारणीसाठी सभासदांनी प्रचंड प्रमाणात शेअर्सला प्रतिसाद दिला आहे. शेतकरी,सभासदांच्या हिताचाच कारभार केला जाईल.' 
जिल्हा परिषद सदस्य अंबरिषसिंह घाटगे म्हणाले,"जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर बाबांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. अन्नपूर्णा शुगरच्या रुपाने शेतकरी, सभासद, कार्यकर्त्यांच्या हक्काचा साखर कारखाना उभा राहत आहे.'' 
प्रास्ताविक के. के. पाटील यांनी केले. दत्तोपंत वालावलकर, धनाजी गोधडे, आनंदा तळेकर, विश्वास दिंडोर्ले, एम. बी. पाटील, राजु भराडे, सुभाष करंजे, मल्हारी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चिमणी उभारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यववरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमास चीफ इंजिनियर शिवाजी शेवडे, चीफ केमिस्ट श्री माने, शेती अधिकारी संजय पाटील उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी सिद्राम मांडरेकर यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT