कोल्हापूर

सांगली : अॅपेक्स हॉस्पिटल रुग्ण मृत्यु प्रकरणी आणखी दोघांना अटक

अटक केलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

प्रमोद जेरे

सांगली : कोरोना (corona patients) रुग्णांवर निष्काळजीपणे उपचार करुन रुग्णांच्या मृत्युस जबाबदार असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या अॅपेक्स हॉस्पिटलचा (appex hospital) मालक डॉ. महेश जाधव याचा सख्खा भाऊ आणि सांगलीचे मेंदु शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. मदन भीमसेन जाधव (वय 49) आणि इसीजी टेक्निशिअन बसवेश्वर कांबळे या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिस स्टेशनच्या (police station) पोलिसांनी अटक केली. त्यांना आज मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात उभे करण्यात आले. (crimecase)

पोलिसांनी त्यांच्याकडे अनेक प्रकारचा तपास करायचा असल्याने या दोघांना किमान सात दिवस पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने या दोघांकडे बराच तपास करावा लागणार असल्याचेही न्यायालयास सांगितले. यावेळी न्यायालयाने सोमवार (28) पर्यंत पोलिस कोठडीत (police custody) ठेवण्याचे आदेश दिले. त्यानतंर माध्यमांशी बोलताना पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी या दोघांकडे तपास केल्यानतंरच या दोघांचा या प्रकरणातील सहभाग निश्चीत होणार असला, तरी त्यांच्याकडे काही मुद्दयांबाबत तपास करणे अत्यावश्यक वाटल्यानेच या दोघांना अटक केली असल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आतापर्यंत दहा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT