Samarjit Singh Ghatge esakal
कोल्हापूर

'तुतारी' हाती घेताच समरजितसिंह घाटगेंची 'डीपीडीसी'वरून गच्छंती; नामनिर्देशित सदस्यपदावरील नियुक्ती रद्द

Kolhapur District Planning Committee : घाटगे यांच्यासह माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल यांची नियुक्तीही रद्द केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महायुतीत कागल विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घाटगे यांनी भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ‘तुतारी’ हाती घेतली.

मुंबई : भाजपला (BJP) रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केलेले कागल येथील नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरील (डीपीडीसी) नामनिर्देशित सदस्यपदावरील नियुक्ती रद्द केली आहे.

घाटगे यांच्यासह माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल यांची नियुक्तीही रद्द केली आहे. नियोजन विभागाने शुक्रवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. महायुतीत कागल विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घाटगे यांनी भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ‘तुतारी’ हाती घेतली.

घाटगे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिल्याने अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाने त्यांची कोल्हापूर ‘डीपीडीसी’वरील नियुक्ती रद्द केली. या समितीवर डॉ. सुभाष जाधव आणि ॲड. हेमंत कोलेकर यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT