April Fools Strong Action corona virus
April Fools Strong Action corona virus 
कोल्हापूर

"एप्रिल फुल' केल्यास होणार कडक कारवाई''

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर- सोशल मीडियावर अफवा पसरविणारे "एप्रिल फुल' कोणीही करू नये. सोशल मीडियाद्वारे एप्रिल फुल म्हणून कोरोना विषाणुबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांवर किंबहुना संबंधित ग्रुपच्या ऍडमीनवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कोणीही एप्रिल फुल करून कायद्याचा भंग करू नये, अन्यथा कारवाई होणार असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिला आहे. 

सोशल मीडियावर सायबर सेलचा वॉच आहे. एप्रिल फुलच्या नावाखाली अफवा अगर गैरसमज पसरविणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे. 

एक एप्रिलला खोट्या माहितीने अनेकांची चेष्ठा केली जाते. विनाकारण दुसऱ्याला त्रास दिला जातो. अखेर एप्रिल फूल म्हणून सांगितले जाते. मात्र सध्या देशात संचार बंदी आहे. कोरोना विषाणुमुळे जिल्हयात लॉकडॉऊन आहे. अशा काळात चेष्ठा म्हणून नेटिझन्स्‌ कडून एप्रिलफूलच्या नावाखाली काही चुकीच्या माहिती देण्याचा प्रयत्न होईल. अशांवर ही थेट गुन्हा दाखल केला जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच असे मॅसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल. तसेच असे मॅसेज आढळल्यास सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, यासाठी 0231 -2665975 किंवा 7218038585 किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT