Atrocities on women kolhapur 
कोल्हापूर

धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आसाममधून एका गर्भवती विवाहितेचे गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आले. तिच्या मुलीला ठार करण्याची धमकी देत तिच्याशी लग्न केले आणि तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आसाम, राजस्थानसह कोल्हापुरात घडला. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये रामकरण बन्सीधर योगी (वय 35), दिलीप रामेश्‍वर योगी (30, दोघे रा. राजस्थान) व अन्य दोन परप्रांतीय महिलांचाही यात समावेश आहे. 

या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पीडित महिला आसाममधील असून, तिला एक मुलगी आहे. संशयित रामकरण, दिलीप योगी व अन्य दोन महिलांनी सप्टेंबर 2020 मध्ये तिला एका ओळखीच्या ठिकाणी बोलवून घेतले. तेथे तिला पिण्यास काहीतरी दिले. तशी पीडिता बेशुद्ध पडली. त्यानंतर संशयितांनी तिला आसाममध्येच एका ठिकाणी नेले. तेथे तिच्या मुलीला ठार करण्याची धमकी देत संशयित रामकरण याच्याशी तिला लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला राजस्थानात घेऊन गेले. तेथे काही दिवस राहिले. त्यानंतर महिन्यापूर्वी तिला ते कोल्हापुरात घेऊन आले. 

कोल्हापुरात संशयितांनी पीडितेला एका भाडेतत्त्वावरील खोलीत डांबून ठेवले. दरम्यान, पीडिता गर्भवती असल्याचे माहीत असतानाही संशयित रामकरण व दिलीप योगीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिला त्या दोघांनी "आम्ही तुला विकत घेतले आहे' असे सांगत मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर त्या दोघांसह अन्य तिघांनी अत्याचार केले. हा प्रकार संबंधित महिलेने शेजारील एका महिलेला सांगितला. त्याच माध्यमातून तिने करवीर पोलिस ठाण्यात येऊन याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री एका संशयितास ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT