awareness of breast cancer the activity in kolhapur 
कोल्हापूर

ऑटो रिक्षातून होणार आता उत्तर भारताची सफर

संदीप खांडेकर

कोल्हापूर : स्तनाचा कर्करोग व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी 'एक झाड लावा एक झाड वाचवा'  विषयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ऑटो रिक्षातून उत्तर भारताची सफर करणार आहोत. त्याची सुरुवात न्यू पॅलेस येथून उद्या (रविवार) सकाळी नऊ वाजता  होणार आहे. सुमारे ४५०० ते ते ५००० किलोमीटरचा प्रवास यादरम्यान केला जाणार आहे, अशी माहिती रजत ओसवाल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

बंगळूरच्या डॉ. नम्रता सिंग सोबत असतील, असेही त्यांनी सांगितले. ओसवाल म्हणाले, 'ही तीस दिवसांची विशेष मोहीम आहे. पुणे-मुंबई-सूरत-वडोदरा- उदयपूर- अजमेर- जयपूर- आग्रा- नवी दिल्ली- शिमला- मनाली- धर्मशाला- डलहौसी- अमृतसर- चंदिगढ- नवी दिल्ली- आग्रा- झाशी- भोपाळ- इंदूर- नाशिक- पुणे या मार्गांवरून ही मोहीम असेल. आमची रिक्षा लोकांना आकर्षित करून त्यांच्यामध्ये नक्कीच या दोन समस्यांबाबत जागृतता निर्माण होईल. मोहिमेसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेतल्या असून सरावासह मोहिमेसाठी सज्ज आहोत.

यावेळी डॉ. सिंग म्हणाल्या, स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती दिसत नाही. महिला, युवती आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत नाहीत. आजाराची उघडपणे चर्चाही करण्यास तयार नसतात. त्यामुळे या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हा एक गंभीर आजार असून याबाबत स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करणे आणि 'झाडे लावा झाडे जगवा' यामुळे पर्यावरणाची हानी कमी होऊन समतोल राखला जाईल, असा सामाजिक संदेश मोहिमेअंतर्गत दिला जाणार आहे." पत्रकार परिषदेस जयेश ओसवाल उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT