कोल्हापूर

गावच्या दूध संस्थेचा सचिव कसा झाला गोकुळचा संचालक; बयाजी शेळके यांचा प्रवास

'गोकुळ'च्या स्थापनेपासून गगनबावडा तालुक्‍याला उमेदवारीची संधी मिळाली नव्हती

पंडित सावंत

असळज (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांचे गगनबावडा तालुक्‍यातील वेसरफ येथील समर्थक बयाजी शेळके (bayaji shelake) यांचा विजय झाला. सर्वसामान्य धनगर समाजातील शेळके यांच्या रूपाने 'गोकुळ'च्या (gokul election) इतिहासात गगनबावडा (gaganbawda) तालुक्‍यास प्रथमच ही संधी मिळाली. एकीकडे मातब्बर चेहरे, नेत्यांचे वारसदार गोकुळच्या उमेदवारीच्या रिंगणात असताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र धनगर समाजातील शेळके यांच्या रूपाने 'गोकुळ'मध्ये गगनबावड्याला संचालक होण्याची संधी दिली.

वेसरफ येथील बयाजी शेळके यांना राजकीय वारसा नाही, ते शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्ते आहेत. वेसरफ येथील लोकांना असळज येथे दोन किलोमीटरची पायपीट करून दूध घालण्यासाठी जावे लागे. त्यामुळे वेसरफ येथे दूध संस्थेची गरज ओळखून बयाजी शेळके यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना रासाईदेवी दूध संस्थेची स्थापना केली. संस्था सचिव म्हणून काम करण्यास कोणी तयार नव्हते, यावेळी बयाजी शेळके यांनी स्वतः जबाबदारी घेत एक वर्ष सचिव म्हणून काम पाहिले. सध्या ते या संस्थेचे चेअरमन (chairman) आहेत. त्यांच्या या निवडीने एका दूध संस्थेचा सचिव, संस्थेचे अध्यक्ष ते संघाचा संचालक अशी झेप त्यांनी घेतली आहे.

'गोकुळ'च्या स्थापनेपासून गगनबावडा तालुक्‍याला कधीही उमेदवारीची संधी मिळालेली नव्हती. अनपेक्षितपणे बयाजी शेळके यांचे नाव चर्चेत आले आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारीची संधी देत विजयी केले. शेळके यांच्या निवडीने पालकमंत्री पाटील यांनी गगनबावडा तालुक्‍याबरोबर निष्ठावंत धनगर समाजातील कार्यकर्त्याचा सन्मान केल्याची भावना तालुक्‍यात व्यक्‍त होत आहे. बयाजी शेळके यांनी तालुका व जिल्हास्तरावर धनगर समाजाच्या प्रश्‍नांविषयी आंदोलने, युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक प्रश्‍नासंदर्भात आंदोलने केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT