कोल्हापूर

कोल्हापूरकरांनी कोणाकोणाला घाबरायचे?

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : एखादा उद्योग, व्यवसाय करण्यासाठी शासकीय किंवा महापालिकेचा परवाना घ्यावा लागतोय. तो घेण्यासाठीही बराच प्रयत्न करावा लागतो; पण असा उद्योग करण्यासाठी एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा परवानाही आवश्‍यक झाला तर? होय. तसा प्रकार कोल्हापुरात चालू झाल्याची माहिती एका प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आली आहे. मला विचारल्याशिवाय उद्योगधंदा सुरू केलाच कसा? असली धमकी देण्याचा प्रकार कोल्हापुरात झाल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे. 

एकूण परिस्थिती पाहता एका वेगळ्या दहशतीची सुरवात जिल्ह्यात झाली आहे. आपल्यावरील यापूर्वीचे गुन्हे म्हणजे आपली ताकद आणि तेच आपले कॉलिफिकेशन अशा समजुतीत वावरणाऱ्यांची नावे यानिमित्ताने पुढे आली आहेत. खरे-खोटे चौकशीत स्पष्ट होईल; पण खंडणीच्या एका नव्या प्रकाराची झलक या निमित्ताने दिसून आली आहे. वास्तविक एखादा उद्योजक सर्व जबाबदारी व अनेक आव्हाने स्वीकारत आपला उद्योगधंदा चालवत असतो. यातही त्याला अनेक वेळा त्रास होतो. त्यातून तो कसाबसा मार्ग काढत असतो; पण आता एक कोणतरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस उठतो आणि मला विचारल्याशिवाय उद्योग सुरू का केला? असे विचारतो. ही बाब गंभीर आहे. तशी तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. असे प्रकार वाढले तर एका नव्या गुन्हेगारीला उद्योजकांना तोंड द्यावे लागणार आहे. 

मुंबई, कल्याण, उल्हासनगर, ठाणे परिसरांत काही गुंडांचा व्यापारी उद्योजकांकडून खंडणी उकळण्याचा धंदा आहे. विशेषतः जागा खरेदी- विक्री, बांधकाम, वाळू, विटा, सळी विक्रेते यांना त्याला तोंड द्यावे लागते. काही ठिकाणी मोठे बांधकाम करण्यापूर्वी त्या एरियातील दादाचीही मान्यता आवश्‍यक असते. कोल्हापूर परिसरात असे चित्र नव्हते; पण एका प्रकरणाच्या निमित्ताने त्याची झलक दिसली आहे. पोलिसांनी छाननी सुरू केली आहे. काही व्यक्तींच्या दहशतीच्या नावाचा आधारही त्यासाठी घेतला असण्याची शक्‍यता आहे; पण या प्रकरणाच्या निमित्ताने पोलिसांनी खोलात चौकशी करण्याची गरज आहे आणि अशा स्वरूपाच्या गुन्हेगारीने हातपाय पसरण्याआधीच संबंधितांच्या हातात बेड्या ठोकणे आवश्‍यक आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच रोखले तरच कोल्हापूर जिल्ह्यातील या प्रवृत्तीचा शिरकाव थांबणार आहे. 

म्हणूनच गुंडांचे वजन 
कोल्हापुरात दोन वर्षांत पोलिस कारवाईचा धमाका चालू आहे. मी म्हणणारे जेलमध्ये आहेत किंवा मी मी म्हणणारे फरारी झाले आहेत; पण त्यातूनही चटका करणारे काहीजण दहशतीच्या जोरावर आपले अस्तित्व दाखवत आहेत. अशांना आपण कोल्हापूरकरांनी काय घाबरायचे? त्यासाठी लोकांनीही तक्रारी करण्यास पुढे येण्याची गरज आहे आणि लोक घाबरतात म्हणूनच या गुंडांचे वजन आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT