The Berkeley Falls area without tourists due to the corona 
कोल्हापूर

कोरोनामुळे बर्की धबधबा परिसर पर्यटकांविना 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बर्की (ता.शाहूवाडी) येथील मनमोहून टाकणारा धबधबा प्रत्येक वर्षी सर्वांचे आकर्षण असतो. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्या बरोबरच कर्नाटकच्या सिमाभागातील हाजारो पर्यटक येथे हजेरी लावतात. परंतु कोरोनाने पर्यटनालाच ब्रेक लागल्याने यावर्षी बर्की पर्यटकाविना पोरकीच झाल्याचे चित्र आहे. 
गावाच्या सिमेवर असणारी कासारी नदी ओलांडल्यानंतर अखंड हिरव्या वाटा, नागमोडी वळणे, कच्चा रस्ता तुडवत बर्की गावात पोहचल्यावर पुढे चार किलोमीटरवरील जंगलाच्या सानिध्यात फेसाळत कोसळणारा जलप्रपात पर्यटकांना आकर्षित करण्यात अलीकडे यशस्वी ठरला आहे. बर्की गावाला ग्रामपंचायत नाही. येथे एकमताने निवडलेल्या ग्रामदान मंडळाच्या माध्यमातून गावगाडा चालविला जातो. अलीकडच्या काळात ग्रामदान मंडळाने पर्यटन कर आकारणी सुरू करून पर्यटकांना या ऐतिहासिक गावच्या विकासाचे भागीदार करून घेतले आहे. यात प्रति पर्यटक, तसेच दुचाकी, चारचाकी पार्किंगसाठी ठराविक कर आकारणी केली जाते. यंदा कोरोनामुळे 'बर्की' धबधब्याचे सौंदर्य झाकोळल्याने पर्यटन महसूलही बुडाला आहे. 

गावकऱ्यांच्या अर्थकारणाला खीळ 
घरोघरी तयार करुन मिळणारे कोल्हापूरी मटण ठरावीक रकमेवर दिले जाते. इथल्या पाण्याला असणारी विशीष्ठ चव यामुळे इथल्या ' खुळ्या रश्‍श्‍याला ' जगात तोड नाही. त्यात नाचण्याची गरमा गरम भाकरी, वाफाळणारा पांढरा धोट भात या सर्वाची चवच न्यारी ! पण पर्यटनच बंद असल्याने गावकऱ्यांना मिळणारे चार पैसेही बंद झाले . 

केवळ भात शेती येथे केली जाते.धबधब्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्याचे किमान चार महीने ग्रामदान मंडळास पार्कीगींगचे उत्पन्न मिळायचे.गावातल्या अनेक घरात घरगुती पद्धतीने जेवण करुन चरितार्थ चालत व हीच मिळकत पुढे जपून वापरली जात असे.आता मात्र गावाचे अर्थचक्रच थांबले आहे. 
-आनंद पाटील, अध्यक्ष, ग्रामदान मंडळ बर्की.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

SCROLL FOR NEXT