Bhagyanagar MLA T Rajasingh esakal
कोल्हापूर

'हिंदू राष्ट्र स्थापनेची वेळ जवळ आलीये, तरुणांनी जोश-होश कायम ठेवून सज्ज राहा'; भाजप आमदाराचं मोठं विधान

श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्ताने जगाने सनातन धर्माची शक्ती बघितली. हीच संघटित शक्ती कायम ठेवून कार्यरत राहू.

सकाळ डिजिटल टीम

विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत आमदार राजासिंह यांनी हिंदू मंदिरातील भाविकांनी दान केलेला सगळा पैसा हिंदू संरक्षणासाठीच खर्च झाला पाहिजे.

हुपरी : ‘‘काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. प्रभू श्रीराम मंदिर उभे राहिले. आम्हाला पाहिजे आहे तेच काशी, मथुरामध्येही घडणार आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेची (Hindu Rashtra) वेळ जवळ आली आहे. तरुणांनी जोश आणि होश कायम ठेवून सज्ज राहावे, असे आवाहन श्रीराम युवा सेनेचे संस्थापक आंध्र प्रदेशातील भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह (T. Rajasingh) यांनी येथे केले.

समस्त हिंदू समाजतर्फे येथे हुतात्मा स्मारक मैदानावर आयोजित हिंदू धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेच्या स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्यासह उद्योगपती राजेश शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, शिवसेनेचे (ठाकरे) माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवराज नाईक, दिनकरराव ससे, सुनंदा औंधकर, समीर मुदगल, नितीन काकडे, किरण दुसे उपस्थित होते.

आमदार राजासिंह म्हणाले, ‘श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्ताने जगाने सनातन धर्माची शक्ती बघितली. हीच संघटित शक्ती कायम ठेवून कार्यरत राहू ’ स्वाती खाडे म्हणाल्या, ‘रामलल्ला मंदिरानिमित्ताने स्टॅलिन, खरगे, आव्हाडसारख्या अनेकांना सनातन संस्कृतीचा पोटशूळ उठला आहे.’ रमेश शिंदे म्हणाले, ‘आठ राज्यांत असणारा लव्ह जिहादविरोधातील कायदा महाराष्ट्रात लागू करावा.’ सभेला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली होती.

मंदिरातील पैसा हिंदूंसाठीच वापरा

विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत आमदार राजासिंह यांनी हिंदू मंदिरातील भाविकांनी दान केलेला सगळा पैसा हिंदू संरक्षणासाठीच खर्च झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT