Rohit Pawar  esakal
कोल्हापूर

Kolhapur Riots : कोल्हापुरात दंगल घडली की घडवली गेली; रोहित पवारांच्या मनात वेगळाच संशय

ज्येष्ठ नेते पवार यांच्यासंदर्भात चुकीचे बोलाल, तर तुमची झोप उडविल्याखेरीज राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

भाजप संविधानाच्या विरोधात काम करत आले आहे. त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी देण्यात येत असेल, तर सामान्य लोकांचे काय?, राज्यातील सद्यस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सामान्य लोकांची मागणी आहे. कोल्हापुरातील दंगल घडली की घडवली गेली, याचा शोध शासनाने घेणे जरुरीचे आहे’, असे आमदार रोहित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते (Rohit Pawar) काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात महिलांचे अपहरण, खून, दरोडा व दंगलीचे प्रकार वाढले आहेत. चांगल्या विचारांच्या राज्यात असे घडत असेल, तर आजच्या स्थितीत लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सामान्यांची भावना आहे. कोल्हापुरातील सामाजिक सलोखा पाहिला आहे.’

ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. समाजात वाद कसा निर्माण करता येईल, हे पाहिले जात आहे. भाजप संविधानाच्या विरोधात काम करत आले आहे. त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे. जे भाजपचे कार्यकर्ते संविधानाविरोधात काम करत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.’

दरम्यान, पवार यांनी अंबाबाई मंदिर, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला भेट दिली. बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी विद्यापीठात जाऊन युवकांशी संवाद साधला. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचीही भेट घेतली.

ज्येष्ठ नेते पवार यांच्यासंदर्भात चुकीचे बोलाल तर..

‘खोट्या बातम्यांवर मोठी पदे मिळविण्यासाठी छोटे नेते निर्माण झाले आहेत. पक्ष बदलेल तसे त्यांचे वक्तव्य बदलत असते. छोट्या विचारांच्या छोट्या कार्यकर्त्यांवर कमी बोलू तेवढे चांगले आहे. मात्र, ज्येष्ठ नेते पवार यांच्यासंदर्भात चुकीचे बोलाल, तर तुमची झोप उडविल्याखेरीज राहणार नाही’, असा इशारा पवार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT