birth of a baby child than family crying in belgaum 
कोल्हापूर

मुलगी जन्माला आली ,कुटुंबीयांचा एकच मोठा हंबरडा मग काय तुफान राडा

सकाळ वृत्तसेवा

वडगाव (बेळगाव) : कोणत्याही घरी मूल जन्माला येणे म्हणजे आनंदाची गोष्ट असते. त्यामुळेच मुलगा किंवा मुलगी झाली तर सर्वजण आनंद व्यक्त करीत असतात. मात्र, येथील एका गल्लीत मुलगी झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी जोरजोराने अश्रू ढाळायला सुरवात केली. त्यामुळे गल्लीत काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.


वडगाव येथील एका कुटुंबातील एका व्यक्तीला लग्नानंतर दोन मुली झाल्या आहेत. मात्र घरात मुलगाही असावा, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे तिसऱ्यावेळी तरी मुलगा होईल, या आशेवर हे कुटुंब होते.

मुलगा व्हावा, यासाठी त्यांनी ज्योतिषांनाही विचारुन घेतले. त्यावेळी त्यांनी मुलगा नक्की होईल, असे सांगितल्यानंतर अंधश्रद्धेपोटी हे कुटुंब आनंदात होते. मात्र बाळाचा जन्म झाला, त्यावेळी पुन्हा मुलगी झाल्याची माहिती मिळताच घरातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. घरातील सर्वचजण एकाच वेळी रडत असल्याने घरात काही वाईट घटना तर घडली नसेल ना, असे समजून गल्लीतील अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यामुळे क्षणाधार्थ या घराकडे मोठी गर्दी जमली.

दरम्यान, घरात मुलगी जन्माला आल्यामुळे रडत असल्याचे समजताच अनेकांनी संताप व्यक्त करीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आजकाल मुलगा आणि मुलीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आज विविध क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. तरीही काही ठिकाणी मुलगी झाली म्हणून अनेक जण नाराज होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे महासत्तेकडे झेपावणाऱ्या देशातील मुलींविषयीची लोकांची मानसिकता कधी बदलणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT