कोल्हापूर

महिला मजुरावर गव्याचा हल्ला; राधानगरीतील घटना

स्नेहल कदम

राधानगरी : येथून दोन किलोमीटरवर असलेल्या कृषी चिकित्सालयाच्या फुलरोपांची भांगलन करणाऱ्या महिलेवर झुडपात लपलेल्या गव्याने हल्ला केला. यात फिजीवडे पैकी लोंढेवाडी येथील केराबाई लक्ष्मण पोकम (वय ४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सीपीआर रूग्नालयात उपचार सुरू आहेत.

येथील हत्तीमहाल परिसरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग कार्यालयाजवळ कृषी चिकित्सालय आहे. या चिकित्सालयात आंबा, काजू, पेरू, नारळ आदींसह विविध फळझाडांच्या रोपांची लागवड केली जाते. कृषी चिकित्सालयाच्या या प्रकल्पावर मजूरीवर काम करणाऱ्या चार महिला आज गुरुवारी सकाळी भांगलनीची कामे करत होत्या. यावेळी झुडपात असणाऱ्या गव्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात केराबाई पोकम या महिलेच्या बरगडीवर, दंडाला आणि छातीवर गंभीर मार बसला. जखमी अवस्थेत त्यांना सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर वन्यजीव विभागाचे वनपाल संजय कांबळे, अमित कटके, सूर्यकांत गुरव, अनिल चांदम यांनी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT