कोल्हापूर

सांगलीत घोषणाबाजी; भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा दाखल

कोरोना नियमांच्या उल्लंघनासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल

शैलेश पेटकर

सांगली : महापुरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच गोंधळ घालत घोषणाबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी भाजप (BJP) कार्यकर्त्यांसह २० जणांचा त्यात समावेश आहे.

महापुरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच गोंधळ घालत घोषणाबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.

माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, अमित भोसले, निलेश निकम, प्रथमेश वैद्य, राहुल माने, शांतीनाथ कर्वे, अश्रफ वांकर, प्रियानंद कांबळे, धनेश कातगडे, राजु जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे, अमर पडळकर, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्यासह अनोळखी सहा जणांचा त्यात समावेश आहे. कोरोना नियमांच्या उल्लंघनासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

अधिक माहिती अशी की,

मुख्यमंत्री ठाकरे काल सांगलीत दौऱ्यावर होते. हरभट रस्त्यावर विविध पक्ष, संघटनांकडून निवेदने स्वीकारण्याचे नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी काही संघटनांच्या मोजक्या प्रतिनिधींना त्यासाठी मुभा दिली होती. त्यात भाजपसह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी होते. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यावर मोठी गर्दी झाली आणि गोंधळ वाढत धक्काबुक्की सुरू झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना गाडीत बसविण्याची विनंती सुरक्षा दलाने केली. ते निवेदने न स्वीकारता निघाले आहेत, हे लक्षात आल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला. साखळकर यांनी निषेधाच्या घोषणा देत निवेदन भिरकावून दिले. त्यानंतर पोलिसांनी साऱ्यांना ताब्यात घेतले. काल रात्री उशीरा १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. कोरोना उल्लंघानासह सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे गुन्हे दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT