The Brahmin convention started at Dussehra Chowk kolhapur
The Brahmin convention started at Dussehra Chowk kolhapur 
कोल्हापूर

तळागाळातील माणसांसाठी प्रत्येक समाजाने प्रयत्न करावेत : जयंत पाटील

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - दुसऱ्या समाजाचा व्देष करून स्वतःच्या समाजाचे पुढारपण करणे, हा एक मोठा गैरसमज आहे. प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील तळागाळातील माणसाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदेच्या सर्व शाखा ब्राम्हण अधिवेशनाला आजपासून येथील दसरा चौकात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ब्राम्हण समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

दरम्यान, सकाळी खरी कॉर्नर परिसरातून शोभायात्रा निघाली. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. मंत्री जयंत पाटील म्हणाले, "ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन परिषदेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. तळागाळातील माणसाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. मराठा समाजाने मध्यंतरी मोठे आंदोलन उभारले. त्यामागेही तोच उद्देश होता. सर्वच समाजाचे काही ना काही प्रश्‍न आहेत. अल्पसंख्यांक दर्जाबरोबरच ब्राम्हण समाजाच्याही काही मागण्या आहेत. त्या मागण्यांबाबत सरकार निश्‍चितच सकारात्मक प्रयत्न करेल. वेबसाईटच्या माध्यमातून ब्राम्हण समाजाने प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करावे आणि त्यातून जे काही प्रश्‍न दिसतील ते शासनाकडे सादर करावेत.'' 

एकीकडे एकोप्यासाठी प्रयत्न होत असताना केंद्र सरकार धार्मिक भावना भडकावण्याचे काम करत आहे. देशाची आर्थिक परिस्थिती खालावली असताना लोकांचे लक्ष विचलित केले जात असल्याचेही मंत्री श्री. पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी आमदार ऋतूराज पाटील, आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूरज कुलकर्णी, ऍड. विजय जमदग्नी, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, मोहिनी भगरे आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT