Breaking: Lockdown in Kolhapur will be relaxed from Monday but ... 
कोल्हापूर

Breaking : कोल्हापुरात सोमवारपासून लॉकडाउन शिथिल होणार पण... 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून (ता. 27) शिथिल होणार आहे. या बाबतची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास दिली. सायंकाळी साडेसहा ते रात्री सव्वादहा पर्यंत आमदार, अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. तसेच नेमकी शिथिलता काय असणार आहे याची माहिती उद्या दुपारी चारवाजेपर्यंत जिल्हाधिकारी दौलत देसाई देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी तब्बल सात दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारपासून हे लॉकडाउन पुन्हा 31 जुलैपर्यंत वाढवणार की नाही याबाबत जिल्ह्यात उत्सुकता होती.

लॉकडाउन बाबात पालकमंत्री पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सायंकाळी साडेसहा वाजता बैठक सुरू केली. तब्बल सव्वादहा पर्यंत ही बैठक चालली. यामध्ये लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय झाला. मात्र कितीवेळ बाजारपेठ सुरू राहणार, दुकाने सुरू राहणार की नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नाही. त्यामुळे उद्या दुपारी चारपर्यंत जिल्हाधिकारी याबाबतची सविस्तर माहिती देतील, असेही पालकमंत्री पाटील यांनी रात्री साडेदहा वाजता सांगितले. 

संपादन: प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT